माढ्यातील (जि. सोलापूर) शारदा शिंदे यांनी आपल्या घरी पारंपारिक गौरी सजावटीला फाटा देत स्वच्छ भारत अभियानाची आरास उभारून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपले गाव स्वच्छ व सुंदर करून हागणदारीमुक्त करण्यासंदर्भातील पुस्तके त्यांनी गौरींसमोर ठेवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरींसमोर खाद्यपदार्थ, खेळणी, विद्युत रोषणाई केली जाते. परंतु, शारदा शिंदे यांनी मात्र गौरी पाहण्यास आलेल्या महिलांना वैचारिक मेजवानी मिळावी यांसाठी प्रबोधनात्मक फलक व विविध प्रकारची ४०० हून अधिक पुस्तकांनी गौरींची सजावट केली आहे.

शिंदे यांनी परिसर, घर आणि गाव स्वच्छतेसाठी लागणारे सुपली, झाडू, कचराकुंडी आदी साहित्य गौरी समोर मांडले आहेत. गौरीसमोर पुरुष व स्त्रीची प्रतिकृती साकारून त्यांच्या हातात स्वच्छते बाबतचे पोस्टर देण्यात आले आहेत. या उपक्रमात शारदा शिंदे यांनी धनश्री शिंदे, दत्ताजी शिंदे, संदीप शिंदे, जयदीप शिंदे, शिवतेज शिंदे यांच्या मदतीने हे आरास उभे केले आहे. गौरी पाहण्यासाठी आलेल्या महिलांना शारदा शिंदे या प्रबोधनात्मक पुस्तके भेट देत आहेत.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh festival 2017 swachh bharat message from gauri carnival unique initiative of woman in madha