साहित्य : राजगिरा लाह्या २ वाट्या, चिक्कीचा गूळ ३/४ वाटी, डार्क चॉकलेट १०० ग्रॅम, बदाम ३-४, अक्रोड ३-४, सूर्यफुलाच्या बिया २ चमचे.
कृती : एका पॅनमध्ये चिक्कीच्या गुळाचा पाक करायला ठेवा. पाकाचा लहान गोळा वाटीत पाणी घेऊन त्यात टाकून बघा. कडक गोळा झाला की, राजगिऱ्याच्या लाह्या घाला. बदामाचे तुकडे, अक्रोडाचे तुकडे आणि सूर्यफुलाच्या बिया घाला. घट्ट गोळा झाला की गॅसवरून उतरवा. एका ट्रेला तुपाचा हात लावून घ्या. मिश्रण नीट पसरवून बारच्या आकारात कापून घ्या. गार झाल्यावर बार काढून घ्या. मायक्रोवेव्हमध्ये डार्क चॉकलेट पातळ करून घ्या. राजगिरा बार एक एक करून डार्क चोकोलेट मधे बुडवून घ्या. राजगिरा चॉकलेट बार तयार. हे बार अतिशय पोषक, भरपूर एनर्जी देणारे सुपर बार्स आहेत !!! गुळाची गोडी पुरेशी असल्यामुळे, डार्क चॉकलेट वापरलं आहे. आवडत असेल तर मिल्क चॉकलेटही वापरू शकता.
सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ