किमतीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ; विक्रीवर परिणाम झाल्याची विक्रेत्यांची खंत

गणपतीचे आगमन अगदी जवळ आले असताना गणपती सजावटीचे मखर आणि लागणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र, मखरांच्या किमती वस्तू-सेवा करामुळे (जीएसटी) वाढल्या आहेत. गणेश मूर्तीपाठोपाठ गणेश मखरालादेखील जीएसटी लागल्याने किमतीमध्ये ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मखरांच्या मागणीवर व विक्रीवरही परिणाम झाल्याचे मखर विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अनेकदा माल जीएसटीच्या फेऱ्यात अडकल्याने बाजारात पोहोचण्यास उशीर झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Government owned energy sector company announces dividend to shareholders print eco news
सरकारी मालकीच्या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीकडून भागधारकांना घसघशीत लाभांशाची घोषणा
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
gst loksatta news
पीकसंरक्षण उद्योगावरील जीएसटी कमी करा, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे मागणी
new income tax bill latest news in marathi
विश्लेषण : नवीन प्राप्तिकर विधेयक यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात? प्राप्तिकरात कपातीची शक्यता किती?
boom IT sector Sensex nifty
‘आयटी’तील तेजीने सेन्सेक्सची ५६६ अंशांनी वाढ; शेअर बाजाराचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे
wipro q3 results profit jumps 24 percent to rs 3354 crore
विप्रोचा नफा २४ टक्के वाढीसह ३,३५४ कोटींवर
Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग

दरवर्षी अनेक प्रकारचे मखर बाजारात येतात. बाजारात विविध प्रकारांमध्ये मखर उपलब्ध असून गणेशोत्सव काळात फुलांच्या मखरांना मागणी वाढली आहे. थर्माकोलचे मखर, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोटय़ा-छोटय़ा दिव्यांच्या माळा, मंदिरांच्या प्रतिकृती, शिवमंदिर, राजमहल, मोरपंखी सिंहासन, कमळ असे थर्माकोल, कागदी व प्लास्टिकचे मखर वसईच्या बाजारात उपलब्ध आहेत.

उत्सवाला काही दिवसच बाकी असल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची खरेदीही सुरू झाली आहे. परंतु यंदा गणेश थर्माकोल, कापड आदी सजावटीच्या सामानांना जीएसटी लागल्याने गणेश मखरांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जे मखर १ हजाराला मिळायचे त्याची किंमत यंदा १४०० पर्यंत गेली आहे.

वस्तू-सेवा करामुळे मखराच्या किमती वाढल्या आहेत. महागाईमुळे दीड महिन्यात केवळ २० मखरे विकली गेली आहे. यंदा नवीन कापडी मखरदेखील बाजारात दाखल होणार असून त्यावर जीएसटी लागल्याने अजूनही ते दाखल झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणपूरक असलेले हे मखर कर्नाटकवरून बाजारात येणार आहे.

– शैलेंद्र घोलम, मखर विक्रेते

Story img Loader