लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाचे अतिशय महत्त्व आहे. यामध्ये मानाचे पाच गणपती, दगडूशेठ, मंडई, बाबूगेनू असे नवसाला पावणारे गणपती यांना विशेष मानले जाते. गणपतीच्या १० दिवसांच्या काळात लोक बाहेरगावहून या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येतात. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचे महत्त्व आजही तितकेच आहे. जाणून घेऊया याच गणपतींविषयी…

पहिला – कसबा गणपती

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. कसबा पेठेत असणारा हा गणपती पेशवेकालीन असून त्याचे मंदिर शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून ती साडेतीन फूट उंचीची आहे. आधी ती खूप लहान होती मात्र शेंदूर लेपून ती मोठी करण्यात आली आहे. हे मंदिर शिवाजीच्या काळातील आहे असे म्हटले जाते. १६३६ मध्ये शहाजी राजांनी लालमहाल बांधला त्यावेळी त्याच्याच बाजूला जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. पारंपारिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रोडवरुन या मूर्तीचे विसर्जन केले जाते.

दुसरा – तांबडी जोगेश्वरी

बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचे आणि पुण्यातील इतरही मोठ्या गणपतींचे दरवर्षी विसर्जन करण्याची पद्धत नाही. मात्र या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते आणि त्यानंतर दरवर्षी नव्या मूर्तीची स्थापना होते.

तिसरा- गुरुजी तालिम गणपती 

या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे. याठिकाणी असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. आता तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मध्ये म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्याच्या आधीच सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

चौथा – तुळशीबाग गणपती

तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो.

पाचवा – केसरी वाडा गणपती

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती म्हणून याची ओळख आहे. केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथं होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. मानाच्या पहिल्या चारही गणपतींच्या विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरुन जाते. मात्र केसरी वाड्याचा गणपती केळकर रोडवरुन जाऊन विसर्जित होतो.