गणेशोत्सवात देवाला नैवेद्य म्हणून गोड काय ठेवायचे असा प्रश्न तमाम स्त्री वर्गाला पडतो. मग सकाळ संध्याकाळच्या आरतीसाठी सारखे विकत तरी काय आणणार? तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि मधुमेहींनाही चालू शकतील असे काही सहज जमणारे पदार्थ करता आले तर? पाहूयात असाच एक हटके आणि सोपा पदार्थ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य : नाचणी पीठ २ वाट्या, आलू बुखारचा पल्प १/२ वाटी, पेअर चा पल्प १/२ वाटी, अननसाचा पल्प १/२ वाटी, सफरचंदाचा पल्प १/२ वाटी, साखर दीड वाटी, दालचिनी पावडर २ चमचे, तूप ४ चमचे.

कृती : एका पॅनमध्ये १ चमचा तूप घालून आलु बुखारचा पल्प घाला. थोडं ढवळून पेअरचा पल्प घाला. अननसाचा आणि सफरचंदाचा पल्प ही घाला. मिश्रण निम्मं होई पर्यंत आटवून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये ३ चमचे तूप घालून नाचणीचे पीठ घाला. खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या. फळांचा पल्प घाला. ढवळून घ्या. १/२ वाटी पाणी घालून शिजवून घ्या. साखर घाला. २ मिनिटं परतून गॅसवरून उतरवा. गार करून घ्या. मळून घ्या. अॅल्युमिनिअम फॉईलमध्ये ठेवून रोल करून घ्या. १ तास फ्रीज मध्ये ठेवून, बाहेर काढून रोल कापून घ्या खिरापत म्हणून वाटा.

 सुकेशा सातवळेकर,
आहारतज्ज्ञ