गणरायाचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. यावेळी केवळ हाताने कष्ट करुन पिकवलेले अन्न सेवन करावे असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. ही पूजा केल्यानंतर महिला बैलांच्या श्रमातून पिकवण्यात आलेल्या धान्यापासून तयार करण्यात आलेले कोणतेही पदार्थ खात नाहीत. यावेळी केवळ हाताने कष्ट करुन पिकवलेले अन्न सेवन करावे असे मानले जाते.
या दिवशी स्त्रिया ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ऋषीपंचमीचा सण साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ या सात ऋषींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर ऋषींनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस मानला जातो. ऋषीमुनी अरण्यात रहायचे. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरायचे. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे म्हणून हा दिन साजरा करावा असे मानले जाते.