साहित्य : दोन वाटय़ा सुरणाचा किस

पाव कप तूप

मीठ

पाऊण वाटी साखर

दोन वाटय़ा तांदळाची पिठी

कृती :

सुरणाचे साल काढून किसून घ्या. नंतर तुपावर किस परतवून वर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्या. किस चांगला शिजल्यावर त्यात साखर घाला व तो व्यवस्थित परतवून घ्या. नंतर दोन वाटय़ा पाणी उकळण्यास ठेवून त्यात चवीपुरते मीठ व तूप घाला. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून ढवळून वाफ आणून घ्या. उकड चांगली मळून मोदकाप्रमाणे सारण भरा. आवडत असल्यास सुकामेवा आणि वेलची पूड घालू शकता.

 

प्रिया निकुम

सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader