सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये सर्वाजनिक गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. मागील वर्षी म्हणजे २०१८ साली पुण्यामध्ये अवघ्या दीड तासामध्ये ३०८२ गणेश मूर्ती बनवण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही या विक्रमाची दखल घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्यानिमित्त पुणे महापालिकेने सणस मैदानावर शाडू मातीच्या मूर्ती साकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात ११६ शाळांतील तब्बल ३ हजार ८२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याच वर्षी वर्षी हाँककाँग येथे एकाच वेळी १०८२ मूर्ती साकारण्याचा विक्रम प्रस्थापित झाला होता. त्यानंतर पुण्यात ३०८२ विद्यार्थ्यांनी १ तास ३१ मिनिटांत प्रत्येकी एक मूर्ती साकारत विद्यार्थ्यांनी एकूण ३०८२ शाडूच्या मूर्ती तयार करत नवा विश्वविक्रम नोंदवल्याचे गिनीज बुकचे सल्लागार मिलिंद वेर्लेकर यांनी सांगितले होते.

या अनोख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ३ किलो मातीची पिशवी आणि त्यासोबत २ बिया देण्यात आल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, अशी भावना उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व गणेशोत्सव २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guinness world record of making 3082 ganesh idols in 91 minutes
Show comments