Moong Dal Modak Easy Recipe: येत्या काही दिवसांत घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. या दिवसांत बाप्पाच्या आवडीचे मोदकही आवर्जून बनवले जातात. उकडीच्या मोदकांसह नारळाचे मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक अशा विविध प्रकारच्या मोदकांचा आस्वाद तुम्ही घेतला असेल. पण, आज आम्ही तुम्हाला मूग डाळीचे पौष्टिक मोदक कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
मूग डाळीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४ कप तांदळाचे पीठ
- ३ कप मूग डाळ
- ६० ग्रॅम गूळ
- २ चमचा वेलची पूड
- ४ मोठे चमचे पिठी साखर
- २ कप दूध
- चिमूटभर मीठ
मूग डाळीचे मोदक बनवण्याची कृती:
हेही वाचा: फक्त उपवासासाठीच नाही आरोग्यासाठीही हे लाडू आहेत खूप पौष्टिक; लिहून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करा आणि त्यामध्ये गूळ घालून मध्यम आचेवर पाच मिनिटांपर्यंत ठेवा.
- जेव्हा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा दूध आणि वेलची पूड एकत्र करून मध्यम आचेवर पाच मिनिटांपर्यंत उकळवा.
- आता यामध्ये मूग डाळ आणि एक कप पाणी मिक्स करा आणि गॅसच्या मंद आचेवर डाळ शिजवून घ्या.
- डाळ शिजल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण गार करून घ्या.
- आता एका भांड्यामध्ये तांदळाच्या पीठामध्ये साखर, मीठ आणि गरम पाणी घालून पीठ मळून घ्या.
- आता या पीठाच्या गोल पुऱ्या करा आणि त्यामध्ये मूगाचे मिश्रण भरा आणि त्याला मोदकाचा आकार द्या.
- अशा प्रकारे सर्व मोदक तयार करा आणि हे मोदक उकडून घ्या.
- मूग डाळीच्या पौष्टिक मोदकाचा बाप्पाला नैवेद्य दाखवा.