Ganesh Chaturthi 2024 Decoration Ideas : यंदा ७ सप्टेंबर २०२४ रोजी घरोघरी बाप्पा विराजमान होतील. त्यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होईल. बाप्पा येणार म्हंटल्यावर त्यांच्या स्वागतासाठी खास सजावट ही हवीच. तर कॉलेज, शाळा, नोकरीतून वेळ काढून सजावट कशी करावी असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. पण, तरीही या सगळ्यातून वेळ काढून, तयार डेकोरेशन न आणता छोट्या-छोट्या गोष्टी जमवून, अगदी कमी वेळात घरच्या घरी सजावट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. जर तुम्ही सुद्धा असंच काही करण्याच्या प्रयत्नात असाल तर आणि तुम्हाला सजावटीसाठी कल्पना ( Ganpati Decoration Ideas ) सुचली नसेल तर तुम्ही पुढील काही पर्यायांचा विचार करू शकता.

१. फुले व नेटचे कापड :

सगळ्यात पहिला भिंतीला दोन वर, दोन खाली असे चार खिळे ठोका. नंतर एक प्लेन रंगाचा कापड खिळ्यांच्या, दोरीच्या साहाय्याने व्यवस्थित बांधून घ्या. त्यानंतर तुम्हाला आवडतील त्या दोन रंगाचे नेटचे कापड घ्या आणि विरुद्ध दिशेने लावण्यास सुरूवात करा. म्हणजेच उजव्या बाजूने एका रंगाच्या पाच आडव्या रेषा तर डाव्या बाजूने दुसऱ्या रंगाच्या पाच आडव्या रेषा अशाप्रकारे कापडावर लावून घ्या. जेणेकरून फोटोत दाखवल्याप्रमाणे काजू कतली सारखा आकार दिसू लागेल. त्यानंतर बाजारातून नकली फुलांच्या दोन रंगाच्या एक किंवा दोन माळा विकत आणा आणि प्रत्येक फूल षटकोनाच्या वरच्या व खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे फुलं व नेटचे कापड डेकोरेशन ( Ganpati Decoration) तयार.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या

२. विटा व पाने :

बाजारातून फोम विकत आणा. विटांच्या आकारात फोम कापून घ्या. नंतर फोमला विटांचा रंग देण्यासाठी गेरू पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी विटांना रंग देण्यास सुरुवात करा. शक्यतो एकाच दिवशी विटांना रंग करून घ्या आणि रात्रभर त्यांना तसंच ठेवून द्या . जिथे गेरू बसणार नाही तिथे तुम्ही ऍक्रेलिक वॉटर कलरचा उपयोग करून फिनिशिंग करू शकता. बाजारातून नकली पानांची माळ घेऊन या. त्यानंतर भिंतीवर एक प्लेन रंगाचे कापड लावून घ्या. दोऱ्याच्या साहाय्याने नकली पाने शिवून कापडावर लावून घ्या. त्यानंतर विटा तयार झाल्या की टूथपिक व टाचण्यांच्या मदतीने या विट्या क्रमाने लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे विटांचे डेकोरेशन ( Ganpati Decoration) तयार.

हेही वाचा…Ganeshotsav 2024 : यंदा बाप्पासाठी बनवा ‘रसमलाई मोदक’; VIDEO तून पाहा सोप्पी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन

३. जास्वंद व रंगीबेरंगी फुलांची सजावट :

१. पांढऱ्या रंगाचे एका मोठा कार्ड पेपर घ्या त्यावर जास्वंदाचे चित्र काढा त्याला लाल रंग द्या. तर हिरव्या रंगाचा क्राफ्ट पेपर घेऊन त्यावर पानांचे चित्र काढून कापून घ्या; जास्वंदाचे फुल व हिरव्या रंगाचे पान तयार.
२. तसेच रंगीबेरंगी फुले बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे कार्ड पेपर बाजारातून घेऊन या. कार्ड पेपरला पाकळ्यांची डिझाईन काढून घ्या आणि त्याच आकारात कैचीने कापून घ्या आणि गम किंवा फेव्हिकॉलच्या साहाय्याने पाकळ्यांचा मधला भाग चिटकवून घ्या.
३. तुऱ्याची फुल बनवण्यासाठी कार्ड पेपर आयताकृती कापून घ्या आणि त्या पेपरचा चौरस होईल अश्या घडी घालून घ्या. घडी घातल्यानंतर समान अंतर ठेवून कापण्यास सुरुवात करा मग फोटोत दाखवल्याप्रमाणे तुमची तुऱ्यांची फुल तयार.
तर ही सगळी फूल चिटकवण्यासाठी फोटोत दाखवल्याप्रमाणे वॉलशीटचा वापर करा आणि टाचण्यांच्या सहाय्याने या वॉल शीटवर फुले चिटकवून घ्या आणि गणपतीच्या अगदी मागच्या बाजूला मधोमध जास्वंदाचे फुल चिटकवून घ्या. अशाप्रकारे तुमचे जास्वंद व रंगीबेरंगी फुलांचे डेकोरेशन (Ganpati Decoration) तयार.

४. रंगीबेरंगी पंखे :

रंगीबेरंगी पंखे बनवण्यासाठी तुमच्या आवडीच्या रंगांचे कार्ड पेपर खरेदी करा. प्रत्येक कार्ड पेपरला छोट्या किंवा मोठ्या आकारात आयताकृती आकारात कापून घ्या. आपण शाळेत पंखा बनवायचो त्याप्रमाणे प्रत्येक कागद एकदा सरळ आणि एकदा उलट्या दिशेने घडी घालण्यास सुरुवात करा. असे दोन सारख्या रंगाचे पंखे तयार झाले की, एका पंख्याचे शेवटचे आणि दुसऱ्या पंख्याचे सुरवातीचे टोक तर नंतर एका पंख्याचे सुरवातीचे व दुसऱ्या पंख्याचे शेवटचे टोक चिटकवून घ्या आणि स्टॅप्लर सुद्धा लावा. अशाप्रकारे तुमचा एक वर्तुळाकार आकाराचा एक मोठा पंखा तयार होईल. अशापद्धतीने तुम्ही रंगीबेरंगी पंखे तयार करून घ्या. त्यानंतर एक मोठा पुठ्ठा घेऊन त्यावर हे सगळे पंखे टाचण्यांच्या साहाय्याने लावून घ्या. फळीच्या साहाय्याने हा पुठ्ठा उभा करा आणि भिंतीला खिळ्यांच्या मदतीने लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे डेकोरेशन (Ganpati Decoration) तयार.

५. पत्रावळ्यांची सजावट :

तुमच्याकडे जुन्या पानांच्या पत्रावळ्या व द्रोण असतील किंवा तुमची बाजारातून सुद्धा विकत आणू शकता. भिंतीला एक प्लेन कापड लावा. पत्रावळ्या आणि कापडाला धाग्यांनी शिवून घ्या आणि पत्रावळ्यांच्या मधोमध द्रोण लावून घ्या. अशाप्रकारे तुमचे डेकोरेशन (Ganpati Decoration) तयार.

या सगळ्या सजावटी दरम्यान तुम्ही लाइटिंग व फोकसचा वापर सुद्धा करू शकता ; ज्यामुळे डेकोरेशन (Ganpati Decoration Ideas) आणखीन उठून दिसेल.

Story img Loader