Rangoli Designs : सध्या सगळीकडे गणपतीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. घरोघरी गणेशोत्सवानिमित्त सजावट, रंगकाम आणि गोडधोड बनवले जात आहे.
गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस गणपतीची मनोभावे आराधना केली जाते. गणपतीसमोर रांगोळी काढली जाते पण तुम्हाला या गणपतीच्या दिवसांमध्ये कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, हा प्रश्न पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला काही हटके रांगोळी डिझाइन्स सांगणार आहोत.
इन्स्टाग्रामवर गणपतीच्या रांगोळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यातील काही हटके व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
एका व्हिडीओमध्ये सुंदररित्या गणपतीची रांगोळी काढली आहे आणि “मोदक प्रिय मुद मंगल दाता, विद्या बारिधि बुद्धी विधाता” असे सुंदर अक्षरात लिहिलेय. ही रांगोळी काढायला अगदी सोपी आहे.
जर तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी काढायला आवडत असेल तर तुम्ही सहा ते सहा ठिपक्यांपासून सुंदर गणेशाची रांगोळी रेखाटू शकता. या रांगोळीत तुम्ही मनाप्रमाणे रंग भरू शकता.
जर तुम्हाला गणेशोत्सवादरम्यान दारात छान छोटीशी रांगोळी काढायची असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. ही रांगोळी काढायला खूप जास्त सोपी आहे. अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही ही रांगोळी काढू शकता. या रांगोळीमुळे तुमच्या दाराची आणखी शोभा वाढेल.
तुम्ही पानांचा आणि फुलांचा वापर करुनसुद्धा रांगोळी काढू शकता. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका ताटात सुंदररित्या पानांपासून गणपती साकारला आहे आणि त्याच्याभोवती फुलांची सजावट केली आहे. तुम्ही ही अनोखी रांगोळी काढू शकता.
जर तुम्हाला अत्यंत साधी आणि लवकरात लवकर काढता येईल अशी रांगोळी डिझाइन जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच. हिरव्या पानामध्ये खूप सुंदररित्या गणपती साकारला आहे.
यासारखे असे अनेक गणपती रांगोळीचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या मदतीने तुम्ही सुरेख रांगोळ्या काढू शकता. युजर्ससुद्धा या रांगोळींवर खूप चांगला प्रतिसाद देताना दिसत आहे.