गणेशोत्सव आणि गाणी यांचे एक अतूट नाते आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठराविक गाणी कायम लावली जातात. काळ बदलत गेला, नवनवीन गाण्यांच्या सीडी, कॅसेट्स बाजारात आल्या. मात्र काही गाणी अशी आहेत ज्यांची नवलाई गेले कित्येक वर्ष तशीच्या तशीच आहे. त्यामुळेच दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही गाणी आवर्जुन लावली जातात. चला तर मग पाहुयात गणपतीच्या काळात लावली जाणारी लोकप्रिय गाणी-

१. ओंकार स्वरूपा –
ओंकार स्वरुपा या गीतसंग्रहातील हे गाणं लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी गायलं असून श्रीधर फडके यांच्या संगीताचा साज या गाण्याला चढला आहे. या गाण्याची मूळ रचना संत एकनाथ यांनी केलं आहे. १९८७ पासून लोकप्रिय ठरलेलं हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

Increase in marigold flower prices during Ganeshotsav 2024
गणेशोत्सवात झेंडू दराने गाठली शंभरी; पावसामुळे झेंडूच्या उत्पादनात घट
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shri Barabhai Ganapati,is famous throughout state including Vidarbha ancient tradition,this Ganpati was preserved by Nath family and Akolekar
अकोल्यातील श्री बाराभाई गणपतीची १३४ हून अधिक वर्षांची परंपरा
eco-friendly Ganeshotsav organized in educational area of ​​Savangi
‘ग्रीन गणेशा!’ यावर्षी सावंगीचा गणेश देणार निसर्गप्रेमाचा संदेश
ganesh Chaturthi 2024 astrology
गणपती बाप्पांच्या आगमनाने उघडणार ‘या’ तीन राशींसाठी नशीबाचे दरवाजे; आजपासून प्रचंड धनलाभ, तुमची रास यात आहे का?
protest ST employees, protest ST Ganesh utsav,
ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन होणार
Pune, Ganeshotsav, ganesh Utsav, pune ganesh Utsav, tradition, social harmony, festival preparations, police involvement
शहरबात : वार्ता उत्सवाची…
The killing scene of Afzal Khan by Shivsagar Govinda Pathak Mumbai news
चौथ्या थरावर अफजलखानाचा वध; शिवसागर गोविंदा पथकाचा थरारक देखावा

२. पार्वतीच्या बाळा –
गणपतीसमोर हमखास लावलं जाणारं गाणं म्हणजे ‘पार्वतीच्या बाळा’. या गाण्यातील आनंद शिंदे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमतो. हे गाणं दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकलं तरी ती मजा येत नाही. त्यामुळे दरवर्षी हे गाणं गणेशोत्सवात आवर्जुन लावलं जातं.

३. अष्टविनायका तुझा महिमा कसा –
१९७९ साली प्रदर्शित झालेल्या अष्टविनायक या चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याला अनुराधा पौडवाल, जयवंत कुळकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश आणि शरद जांभेकर यांचा स्वरसाज चढला आहे. तर जगदीश खेबुडकर यांनी गाण्याची रचना केली आहे. या गाण्याला अनिल-अरुण यांनी संगीत दिलं आहे.

४. उठा उठा सकळीक –
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याचं संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे. तर रचना रामानंद यांनी केली आहे.

५. तुज मागतो मी आता –
हे गाणं रामकृष्ण बापू सोमयाजी यांनी रचलं असून लता मंगेशकर यांनी गायलं आहे. तर संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

६. अशी चिकमोत्याची माळ-