दगडूशेठ हलवाई गणपती हे म्हणजे पुणेकरांचा लाडका बाप्पा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मानाच्या पाच गणपतींमध्ये या गणपतीचा समावेश होत नाही. तरीही या गणपतीचं विशेष महत्त्व आहे. त्याची बैठक, त्याचा मुकुट, त्याचे अलंकार त्याचं रुप सगळं काही लोभस आहे. त्याचमुळे पुणेकरांचे पाय या मंदिराकडे आपोआप वळतात. गणेशोत्सवात या गणपतीच्या दर्शनालाही सगळ्यांचीच गर्दी होते. याच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची लाईव्ह आरती तुम्ही गणेशोत्सव काळात रोज रात्री ८ ते ९ या वेळात लोकसत्ता डॉट कॉमवर लॉग इन करून पाहू शकता.

श्रीमंत दगडू शेठ गणपतीची आरती पाहण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
How to invest in mutual fund SIPs the right way
म्युच्युअल फंडामध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या, SIP कशी सुरू करावी?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

दगडूशेठ हलवाई गणपतीचा थोडक्यात इतिहास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठ भागात असलेले दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहण्याची इमारत होती. त्याकाळी पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई या दोघांना दुःख झालं. याच काळात त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की आपण काही काळजी करु नका एक दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करा वर त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवतं आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. अशा रितीने तयार झाली ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. १८९६ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला. याच काळात दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. पण त्यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा कायम राहिली. १९६७ मध्ये पुन्हा एकदा नवी मूर्ती तयार करण्यात आली.

Story img Loader