Viral Video : सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सगळीकडे जल्लोषात बाप्पाचे आगमन सुरू आहे. ठिकठिकाणी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. गणेशोत्सवातील दहा दिवस बाप्पाची पुजा आराधना केली जाणार. बाप्पाला मोदक लाडू व मिठाईचा नैवद्य दिला जाणार. तसेच दर दिवशी बाप्पासमोर विविध प्रकारची रांगोळी काढली जाणार. तुम्हाला गणपतीची रांगोळी काढता येते का? जर नाही, तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. आज आपण विड्याच्या पानांपासून सोपी अशी गणपतीची रांगोळी कशी काढावी, हे जाणून घेणार आहोत. फक्त एका मिनिटांमध्ये तुम्ही ही रांगोळी काढू शकता.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –
सुरुवातीला ८ विड्याचे पान घ्या. त्यानंतर सुरुवातीला एक पान ठेवा त्यानंतर त्याच्या बाजूला गणपतीच्या कानाचा आकार देत दोन्ही बाजून दोन पान ठेवा. त्यानंतर गणपतीचा पोटाचा आकार देण्यासाठी मध्येभागी ठेवलेल्या पानाच्या खाली आणखी एक पान ठेवा. त्यानंतर गणपतीच्या हातासाठी दोन पान त्याच्या शेजारी ठेवा आणि शेवटी गणपतीचे पाय साकारण्यासाठी दोन पान आडवे ठेवा. सर्वात वरती मध्यभागी ठेवलेल्या पानावर टिळा लावा. पानांपासून गणपती साकारलेला दिसून येईल. कोणत्याही रांगोळीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असा विड्याच्या पानांचा गणपती साकारू शकता.

Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
People caught the leopard in bihar shocking video goes viral on social media
अरे जरा तरी दया दाखवा रे! बिबट्याचे दोन्ही पाय पकडले, गळा दाबला अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

हेही वाचा : Pune Indapur Truck : पुण्यात मद्यधुंद ट्रक चालकाचा थरार! हॉटेल मालकाने जेवण नाकारल्याने हॉटेलमध्ये घातली ट्रक, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतु

im_mounika_92 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पानांचा गणेशा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सुंदर आणि क्रिएटिव्ह” तर एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर!!!” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर गणपती साकारला आहे.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून त्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी बाप्पाच्या रांगोळीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहे. अगदी सोप्या पद्धतीने सोशल मीडियावर गणपतीची रांगोळई कशी काढायची, याविषयी ट्रिक सांगितली जाते. अनेक व्हिडीओ लोकांच्या पसंतीस सुद्धा उतरतात. लोक त्या व्हिडीओवर लाइक कमेंट्सचा वर्षाव करतात.

Story img Loader