ganpati visarjan celebrate by Indian Army : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सियाचीन सीमेवरील गणेशोत्सवाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. देशभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. त्यात अनेकांनी पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात आनंदात निरोपही दिला. त्याचप्रमाणे सियाचीनमधील भारतीय सीमेवरही जवानांनी पाच दिवस मनोभावे पूजा करीत गणपती बाप्पाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला. या निरोपाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सियाचीन ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी आहे. येथे तैनात भारतीय जवान अनेक अडचणींना तोंड देत रात्रंदिवस आपल्या सीमेचे रक्षण करत असतात. यामुळे कुटुंबापासून दूर राहत या जवानांना सीमेवरच सण-समारंभ साजरे करावे लागतात. काही वेळा कठीण परिस्थितीत तर हे सणही पाहायला मिळत नाहीत. पण सियाचीन सीमेवर होणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाने जवानांना लढण्यासाठी दहा हत्तींचे बळ मिळत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लडाखच्या लेहमधील सियाचिन सीमेवर भारतीय जवान वाजत-गाजत अगदी आनंदात पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देत आहेत. लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी एक मिलिट्री व्हॅन खास पद्धतीने सजावण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये गणपती बाप्पाच्या आजूबाजूने मावळ्यांच्या वेशातील जवान छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले भगवे झेंडे हातात घेत उभे आहेत.

या विसर्जन मिरवणुकीत उपस्थित जवान गालालाची मुक्त उधळण करत नाचण्यात दंग आहेत, या मिरवणुकीत लेझीमच्या खेळाने एक वेगळाच बहार आणली आहे. याशिवाय अनेक जवान हातात छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो असलेले भगवे झेंडे फडकवत डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत..

काठीनं घोंगडं घेऊ द्या की रं, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा यासह अनेक मराठमोळ्या गाण्यांवर भारतीय जवानांनी ठेका धरला. अगदी आनंदात, वाजत, गाजत सियाचीन सीमेवर गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक पार पडली.

सियाचिन बॉर्डरवर भारतीय जवानांनी गणरायाला दिला निरोप! पाहा व्हिडीओ

सियाचीन सीमेवरील गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा व्हिडीओ आमच्या loksattalive वर शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त युजर्सनी पाहिला आहे. तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने गणपती बाप्पाकडे साकडं घालत लिहिले की, हे गणपती बाप्पा माझ्या सर्व जवान भावांना सुखरूप ठेवा, त्यांच्यावरील विघ्न दूर करा, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय श्रीराम जय भारतमाता की जय…

Story img Loader