Happy Ganesh Chaturthi 2024 Wishes Quotes : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाची सुरुवात शनिवारी, ७ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. या विशेष दिवशी प्रथम देवता श्रीगणेशाची मनोभावे पूजा केली जाते. शक्ती, बुद्धी, समृद्धी संपत्ती यांच्या या देवतेला वंदन करीत सर्व संकटांपासून मुक्ती मिळो आणि आर्थिक प्रगतीसाठी आशीर्वाद घेतले जातात. भक्त गणपती बाप्पाची घरी वा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात मोठ्या श्रद्धेने प्राणप्रतिष्ठापना करीत विधिवत पूजा-अर्चा करतात. अशा या गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना, प्रियजनांना खास मराठीतून WhstsApp, Facebook Instagram Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (happy ganesh chaturthi 2024 wishes in marathi)

१) मोदकांचा प्रसाद केला,
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत-गाजत बाप्पा आले
गुलाल फुले, अक्षता उधळे,
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
गणेश चतुर्थीनिमित्त खूप खूप शुभेच्छा!

२) श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

३) तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

४) वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेशभक्तांना
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

५) कुणी म्हणे तुज गणपती
विद्येचा तू अधिपती
कुणी म्हणे तुज वक्रतुंड
शक्तिमान तुझी सोंड
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा!

६) स्वर्गातही मिळणार नाही ते सुख
तुझ्या चरणाशी आहे..
संकट असू दे कितीही मोठे
तुझ्या नावात सर्वांचे समाधान आहे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Read More News On Ganesh Chaturthi : Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव कधी सुरू होतोय? घरोघरी बाप्पा कधी विराजमान होणार? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी अन् शुभ मुहूर्त….

७) गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटांचे झाले निवारण लाभले तुझ्या आशीर्वादाने सर्व काही
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

८) बुद्धिदाता, सुखकर्ता, दु:खहर्ता श्रीगणेश तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्नांचं हरण करो… गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!

९) तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया,
संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया…
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

१०) गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

गणपती बाप्पा कोट्स (Ganpati Bappa Quotes In Marathi)

१) अडचणी खूप आहेत जीवनात
पण त्यांना समोर जाण्याची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते

२) चारा घालतो गाईला, प्रार्थना करतो गणरायाला
सुखी ठेव माझ्या कुटुंबाला हेच वंदन गणपतीला

३) चुकली वाट ज्याची, त्याला तुझं दार
ज्याला नाही कोणी, त्याचा तू आधार बाप्पा..!!

४) गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिवशी बाप्पा तुमच्या सर्व स्वप्नांना साकार करो!

५) तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थी २०२४ इन्स्टाग्राम कॅप्शन (Ganpati Captions for Instagram in Marathi)

१) विघ्नहर्त्याचे स्वागत, आनंदाचे आगमन! गणपती बाप्पा मोरया!

२) प्रेम, भक्ती आणि श्रद्धेने सजलेले बाप्पाचे आगमन!

३) सर्व संकटांचे निवारण, फक्त बाप्पाच्या चरणांमध्ये!

४) बाप्पाच्या चरणी नतमस्तक, हृदयात फक्त आनंद आणि भक्ती!

५) मागणं काही नाही बाप्पा फक्त प्रयत्नांना साथ दे..!

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy ganesh chaturthi 2024 wishes in marathi check ganesh chaturthi 2024 wishes sms facebook messages whatsapp messages status instagram caption greetings quotes in marathi sjr