How to make a Dhoop at home? गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. यावेळी पुजेसाठी आणि घरातल्या इतर कामांसाठी धूपाचा वापर केला जातो. घर सुगंधित होण्यासाठी धुप लावणं उत्तम मानलं जातं. बाजारातून आणलेल्या धूपात केमिकल्स असण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. केमिकलयुक्त धुपाचा धूर फुफुसात गेल्याने अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे घरगुती धूप करून पाहा. सुगंधित धूप आपण घरच्याघरी देखील बनवू शकता. तेही वापरलेल्या फुलांपासून…कसा? चला पाहुयात वापरलेल्या फुलांपासून घरच्या घरी धुप कसा बनवायचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात आधी फुलं सुकवायची. आता ऊन कमी आहे पण जेवढं ऊन पडेल त्या उन्हात फुलं वाळवायची. मिक्सरमध्ये फिरवून त्यांची बारीक भुकटी करायची. मग त्यात अंदाजे तूप आणि कापूर भूकटी घालून लहान लहान गोळे करायचे. ओलसर लागतात गोळे. आपण यात इतर सुगंधित पदार्थ घालून देखील बनवू शकता. चॉकलेट ट्रे असेल तर त्या आकारात ते सारण भरुन कडक वाळवून घ्यायचं. ऊन्हात आठ दिवस कडक वाळवायचं. चांगले कडक वाळले की आपला सुगंधी धूप तयार. अतिशय सौम्य सुगंधाचा धूप घरी वापरण्यासाठी असा तयार करता येतो. एका गृहिणीने ही सोपी पद्धत दाखवली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: ‘हे’ ५ पदार्थ मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका; भांड्यातील पाती बिघडून खडखडा वाजू लागतील

अगदी कमीत कमी खर्चात ऑरगॅनिक धूप तयार होईल. हे धूप आपण बनवून साठवून ठेवू शकता. या धुपाच्या वापरामुळे डास देखील घरातून पळून जातील. व घर कायम फ्रेश व सुगंधित राहेल.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How do you make homemade dhoop sticks from flowers making of organic dhoop sticks at home srk