Ganeshotsav 2023 Dates: बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला… गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत मुंबई- पुण्यासहीत महाराष्ट्रभर गणरायांना निरोप दिला गेला. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या दहा दिवसात गाजणानाच्या गजरात सारी सृष्टी दुमदुमली होती. करोनाचे महासंकट टळल्यापासून पहिल्यांदाच अस्सल महाराष्ट्राच्या उत्साहात यंदा गणेशाचे आगमन, पूजन विसर्जन पार पडले. यंदा बाप्पांना निरोप देताना आतापासूनच भाविकांमध्ये पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे कुतुहूल आहे. पण खरंतर आपण पुढच्या वर्षी लवकरच यायची कितीही सूचना देऊन पाठवणी केली असली तरी २०२३ मध्ये बाप्पाचे आगमन यंदापेक्षा थोडे उशिरा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०२३ मध्ये बाप्पा कधी येणार?

हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १९ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे यंदाच्या तारखेनुसार मोजल्यास पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना २० दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे.

Visarjan 2022 Video: बाप्पा तू जायचं नाहीच! ‘या’ चिमुकल्यांचे निरागस हट्ट पाहून व्हाल भावुक

दरम्यान, यंदा मुंबापुरीत गणेशोत्सवाचा सोहळा अत्यंत देखणा साजरा झाला. विशेषतः नागरिकांनी स्वतःहून पर्यावरण रक्षणाचे भान ठेवल्याने यंदा शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देणे, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा घरगुती सोय करणे असे सर्व पर्याय अंमलात आणलेले दिसून आले. इतकेच नव्हे तर काल अनंत चतुर्दशी झाल्यावर आज अनेक सेवाभावी संस्था, सेलिब्रिटी कलाकार व राजकीय नेत्यांनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीमही राबवली होती. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा बाप्पाच्या आवडीचा ठरला असेल यात काही शंका नाही. पुढील गणेशोत्सवापर्यंत हेच भान कायम राखल्यास बाप्पा नक्कीच खुश होतील.