How to Make Khirapat Recipe: गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे.महाराष्ट्रात तर हा सण खुप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.घरोघरी फुलांची आरास सजलेली असते.धूप-दीपांचा सुगंध दारोदारी दरवळत असतो.पुर्विच्या काळी एक-दोन प्रकारचेच मोदक बनवले जायचे परंतु काळानुसार त्यात बदल होत आहेत.आपण पारंपारिकतेला अधुनिकतेचा साज देत वेगळेपण जपुन परफेक्ट पारंपरिक रेसिपी जाणून घेऊयात. गणपतीसाठी वेगवेगळ्या खिरापती केल्या जात असल्या तरी पहिला मान असतो तो खोबऱ्याच्या खिरापतीला. सुक्या खोबऱ्याची खिरापत आणि पंचखाद्याची खिरापत ही प्रसाद म्हणून वाटण्यासाठी पहिले केली जाते. अनेक घरांमध्ये गणपती उत्सवाची तयारी म्हणून आधी खिरापत तयार केली जाते.
साहित्य :
- ३/४ कप किसलेले सुके खोबरे (सुक्या खोबर्याची १/२ वाटी)
- १ टेस्पून खसखस
- १५० ग्राम खडीसाखर
- ४ वेलचींची पूड
- ६ ते ७ खारका
- ८ ते १० बदाम
कृती :
- खारकांच्या बिया काढून टाकाव्यात आणि खारकांची पूड करून घ्यावी. बदामाची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यावी.
- किसलेले सुके खोबरे मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे परातीत काढावे.
- मंद आचेवर खसखस भाजून घ्यावी. खलबत्त्यात कुटून घ्यावी.
- बदामाची पूड आणि खारकांची पूड मध्यम आचेवर भाजून घ्यावी. खुप जास्त भाजू नये नाहीतर करपू शकते.
- खडीसाखर खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी. भाजलेले खोबरे, भाजलेले खसखस, भाजलेली बदाम-खारकांची पूड, खडीसाखर आणि वेलचीपूड एकत्र करून मिक्सरमध्ये भरडसर खिरापत तयार करून घ्यावी.
ही खिरापत गणपतीत प्रसाद म्हणून वाटतात.