सांगली : मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात ढोलताशांच्या दणदणाटात सांगली संस्थानच्या गणेशाचे शाही मिरवणुकीने सरकारी घाटावर मावळत्या सुर्याच्या साक्षीने शनिवारी विसर्जन करण्यात आले. गणपती पंचायतनच्या श्रींचे विसर्जन होताच, सरकारी घाट, समर्थ घाट आदी ठिकाणी घरगुती गणेश विसर्जनास मोठी गर्दी गणेश भक्तांनी केली.आज दुपारी सांगलीच्या ऐतिहासिक गणेश दुर्गमधील दरबार हॉलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्रींच्या उत्सवमुर्तीच्या विसर्जन मिरवुणकीस सुरूवात झाली. पारंपारिक पालखीतून निघालेल्या विसर्जन मिरवण्ाुकीमध्ये विजयसिंहराजे पटवर्धन आणि त्यांचे कुटुंबिय, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदींसह पोलीस अधिक्षक बसवराज तेली उप अधिक्षक अण्णासाहेब जाधव आदी सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरबार हॉलपासून राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ ते गणेश मंदिर या मार्गावरून टिळक चौकमार्गे कृष्णानदीवरील सरकारी घाट असा मिरवणुकीचा मार्ग होता. या मिरवणुकीच्या मार्गावर दुतर्फा गणेश भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीत टाळ मृदंगांचा निनाद, झांज व ढोल ताशांचा कडकडाटही होता. मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या घोषणामध्ये सरकारी घाटावर गणपती पंचायतनच्या गणेशमुर्तीचे विसर्जन सुर्यास्तावेळी करण्यात आले.

हेही वाचा >>>सोलापूर: नणंदेचा मुलगा दत्तक घेण्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या

गणपती संस्थानच्या श्रींचे विसर्जन होताच, घरगुती गणेश मंडळाचे विसर्जन करण्यासाठी सांगलीकरांची कृष्णा तिरी गर्दी उसळली. या ठिकाणी महापालिकेने निर्माल्य कुंड, विसर्जन कुंड आणि गणेशमूर्ती दान कक्ष सुरू केले आहेत. सांगलीतील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपचे कार्यकर्ते नदी प्रदुषण रोखण्यासाठी कृष्णा नदीकाठी प्रबोधन करत असून निर्माल्य, श्रींच्या मूर्तीही संकलित करण्यात येत आहेत. महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात विविध ३५ ठिकाणी विसर्जन कुंड आणि निर्माल्य संकलन केंद्र सुरू केले आहेत.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immersion of ganesha of sangli sansthan with royal procession amy
Show comments