पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी मध्यभागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. गणेशोत्सवाचा प्रारंभ १९ सप्टेंबरपासून होणार आहे. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मंडई, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग परिसरात सजावट साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. सजावट साहित्य, पूजा साहित्य खरेदीसाठी आठवडाभर राहिला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केली होती. मंडई, तुळशीबाग, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी कोंडीतून वाट काढत खरेदी केली. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा : ‘लवकर वे‌‌ळेवर उठायला शिका’, अजितदादांचा पालकमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
police action on massage parlour misbehavior is going on in name of massage parlour
मसाज पार्लरच्या नावाखाली गैरप्रकारांवर कारवाईचा बडगा, वर्षभरात पोलिसांकडून ३३ गुन्हे दाखल
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?

सुट्टी असल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. अनेकजण मोटारीतून मध्यभागात खरेदीसाठी आले होते. मध्यभागातील मंडई, नारायण पेठ परिसरात वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने या भागात मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. मध्यभागाासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. खरेदीसाठी आठवडाभर राहिल्याने अनेकांनी शनिवार आणि रविवारी आलेल्या सुट्टीचे ओैचित्य साधून सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला.

हेही वाचा : देशी बनावटीचे पिस्तूल हाताळताना गोळीबारात तरुण जखमी, खडकवासला परिसरातील घटना

बेशिस्तीमुळे वाहतूक विस्कळीत

उपनगरातील नागरिक गणेशोत्सवात आवर्जुन मध्यभागातील मंडई परिसरात खरेदीसाठी येतात. मध्यभागातील गल्ली बोळात बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मंडई ते शनिपार परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमामावर गर्दी करतात. गर्दीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी लावाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Story img Loader