पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी मध्यभागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. गणेशोत्सवाचा प्रारंभ १९ सप्टेंबरपासून होणार आहे. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मंडई, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग परिसरात सजावट साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. सजावट साहित्य, पूजा साहित्य खरेदीसाठी आठवडाभर राहिला आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी केली होती. मंडई, तुळशीबाग, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी कोंडीतून वाट काढत खरेदी केली. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा