Ganesh Chaturthi 2022: देशभरात गणेश चतुर्थीची तयारीला सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणेशाची विशेष पूजा केली जाते. पहिल्या दिवशी गणेशाची मूर्ती आणून स्थापना केली जाते. जर तुम्ही घरी गणेशाची स्थापना करत असाल तर तुम्हाला माहित असेलच की घरात कोणत्या प्रकारची गणेशमूर्ती बसवायची आहे. कारण चुकीची मूर्ती आणणे शुभ मानले जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. काही लोक याकडे लक्ष देत नाहीत आणि चुकीची मूर्ती घेऊन घरी येतात, त्यांना गणेशाचा आशीर्वाद मिळत नाही. पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. यावेळी गणेश चतुर्थी ३१ ऑगस्ट रोजी आहे आणि अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबर २०२२ रोजी येत आहे.

( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: घरच्या घरी बनवा परफेक्ट मोदक; फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स)

गणेशाची मूर्ती कशी असावी

श्रद्धेनुसार घर आणि मंदिरात गणेशाची मूर्ती स्थापन करण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. ज्या गणेशाची सोंड उजवीकडे वळलेली आहे त्या मूर्ती सिद्धीपीठाशी संबंधित आहेत. अशी गणरायाची मूर्ती घरात बसवली जात नाही असे मानले जाते. त्याचबरोबर ज्या मूर्तीमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळलेली असते, ती मूर्ती घरात बसवता येते. अशी गणेशाची मूर्ती घरात बसवल्याने सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. तसंच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Install these type of murthi at home on ganesh chaturthi considered auspicious gps
Show comments