Jyeshtha Gauri Avahana 2024 Date Time Puja Muhurat: घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन झालेलं आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल. यंदा १० सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल.

ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तीन दिवस हा सण साजरा केला जातो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

केव्हा आहे गौरी आगमन आणि गौरी पूजन ( Date of Gauri Avahana and Gauri pujan 2024)

यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल.

हेही वाचा – Ganesh Visarjan 2024 : दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

गौरी आवाहन शुभ मुहूर्त (Gauri Avahana 2024 Time)

१० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच या दिवशी दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहू काळ असेल.

गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल. १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत असेल अनुराधा नक्षत्र समाप्ती होईल.

हेही वाचा – गणपतीला प्रिय आहेत ‘या’ ३ राशी! जाणून घ्या कोणत्या राशींवर असते बाप्पाची विशेष कृपा?

ज्येष्ठ गौरी आवाहनाचे महत्त्व (Gauri Avahana importance)

या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते. बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मळातात. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.

हेही वाचा – गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..

गौरी आवाहन (Gauri Avahana )

गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला-पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते. यावेळी ”गौरी आली, सोन्याच्या पावली…गौरी आली, चांदीच्या पावली…गौरी आली, गाई वासराच्या पावली…गौरी आली, पुत्र-पौत्रांच्या पावली…” असे म्हणत गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवद्य दाखविला जातो.

गौरी पूजन (Guri Pujan)

दुसऱ्या दिवशी, जेष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि गोडधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरणाचा स्वयंपाक असे पंचपक्वान्न केले जातात. या दिवशी सवाष्ण आणि ब्राह्मणांना जेवायला बोलावले जाते. तसेच गौरींना लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचाही नैवद्य दाखविला जातो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहिली जातात. सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी-कुंकवासाठी बोलावले जाते. तसेच कुटुंबातील सदस्य, नातेवाईंकाना आणि मित्र-मैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलावतात.

हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी चिमुकल्याने गायले “आमच्या पप्पांनी गणपती आणला”गाणे, गोंडस हावभाव बघून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू, पाहा Viral Video

ओवसा

अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओवसा भरण्याची पद्धत असते. ओवसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे , ज्याला ववसा असेही म्हटले जाते. या परंपरेद्वारे घरातील सुनेला मानसन्मान दिला जातो. त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात.

हेही वाचा – Ganesh Utsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन! सिंह रथातून निघाली मिरवणूक, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत, पाहा Viral Video

गौरी विसर्जन (gauri Visrjan)

तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते, तर काही जणांकडे विसर्जन झाल्यानंतर १० दिवसांनीच गणपतीचे विसर्जन होते.

Story img Loader