Jyeshtha Gauri Avahana 2024 Wishes : घरोघरी लाडक्या बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती गौरींच्या आगमनाची. घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत, घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र पाहायला मिळेल. यंदा १० सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होईल. या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचे आवाहन केले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहात स्वागत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केव्हा आहे गौरी आगमन आणि गौरी पूजन (When is Gauri Advent and Gauri Poojan)

यंदा मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल; तर बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, १२ सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल.

गौरी आवाहन शुभ मुहूर्त (Gauri Abhana auspicious time)

१० सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असेल.
तसेच या दिवशी दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहू काळ असेल.

गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून अनुराधा नक्षत्राला प्रारंभ होईल आणि १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्राची समाप्ती होईल.

हेही वाचा – Jyeshtha Gauri Avahana 2024 : “आली गवर आली सोनपावली आली”, कसे केले जाते ज्येष्ठा गौरीचे आवाहन आणि पुजन?

ज्येष्ठा गौरी आगमनानिमित्त खास मराठी शुभेच्छा! (Special Marathi greetings for the arrival of Jyeshtha Gauri!)

सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई,
पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई!
गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

: ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा २०२४ संदेश| गौरी पूजन २०२४ शुभेच्छा संदेश (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी,
उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी
आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली
आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा २०२४ संदेश| गौरी पूजन २०२४ शुभेच्छा संदेश(सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोन्याच्या पावली गौराई घरी आली,
आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!


: ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा २०२४ संदेश| गौरी पूजन २०२४ शुभेच्छा संदेश, (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गौरी-गणपतीच्या आगमानसाठी सजली संपूर्ण धरणी,
सोन्याच्या पावलांनी गौरी येऊ दे आपल्या घरी,
लाभो आपणास सुख-समृद्धी
होवो आपली प्रगती
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा – Ganesh Visarjan 2024 : दीड, पाच, सात किंवा दहाव्या दिवशीच का केले जाते गणेशमूर्तीचे विसर्जन? गौरींचे विसर्जन कोणत्या दिवशी होते?

लेकी-सुनांची माय माऊली
देईल मायेची सावली,
आली गौराई माहेराला,
भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला
करा तिची मनोभावे सेवा
ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा
जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

: ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा २०२४ संदेश| गौरी पूजन २०२४ शुभेच्छा संदेश, (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आली आली गं गौराई आली माहेराला,
चला गं सयांनो, गौराईच्या पुजनाला!
आरतीचे ताट घ्या ओवाळायला
मानाचा पाट द्या दिला बसायला
चला गं सयानों, गौराईच्या पुजनाला!
चहा-पाणी द्या तिला प्यायला,
आवडची भाजी-भाकरी द्या तिला खायला
चला गं सयानों, गौराईच्या पुजनाला!
भरजरी पैठणी द्या तिला नेसायला,
दागिने द्या तिला सजायला
चला गं सयानों, गौराईच्या पुजनाला!
माता गौराई नमन करते तुला,
सुख-समृद्धी लाभू दे माझ्या कुटुंबाला
चला गं सयानों, गौराईच्या पुजनाला!
जेष्ठा गौरी पूजनाच्या शुभेच्छा!

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jyeshtha gauri puja 2024 jyeshtha gauri avahan 2024 wishes hd images whatsapp status sms and greetings snk