गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागचा राजा लालबाग येथील सार्वजनिक गणपती मंडळात विराजमान झाला. या राजाची यावर्षी शोभा वाढवली ती सोन्याच्या मुकुटाने. १५ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला आणि २० कोटी रुपये किंमत असलेला हा मुकुट अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाच्या चरणी वाहिला होता. अनंत चतुर्दशीला लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. त्यानंतर आता हा मुकूट लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.
लालबागच्या राजाच्या मुकुटाची चर्चा
लालबागच्या राजाच्या मूर्तीला अर्पण करण्यात आलेला हा मुकूट २० किलो सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनतर्फे दान देण्यात आला. अनंत अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब लालबागचा राजा मंडळाशी जोडला गेला आहे. गणेश उत्सव संपल्यानंतर राजाचा मुकूट हा उतरवण्यात आला आहे. हा मुकूट लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे. बँकेच्या लॉकरमध्ये हा मुकूटमध्ये ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सव २०२५ मध्ये हा मुकूट राजाला पुन्हा घालण्यात येणार आहे. लालबागचा राजा मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी ही माहिती दिली आहे.
मुकेश अंबानी यांनी दर्शन घेतलं
मुकेश अंबानी यांच्या अँटेलियामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी या दर्शनला आले होते. तसंच मुकेश अंबानी यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट तसंच श्लोका मेहता हे सगळे त्यांच्यासह होते.
धार्मिक कार्यांमध्ये अंबानींचा सहभाग
धार्मिक कार्यांत अंबानी कुटुंब कायमच सहभाग घेताना दिसतं. घरात लग्न असो किंवा इतर कुठला धार्मिक कार्यक्रम असो त्यात अंबानी कुटुंब त्यात सहभागी असतं. राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अंबानी कुटुंब सहभागी झालं होतं. मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांमधून मंदिरांमध्ये पूजा-अर्चा करताना दिसतं आहे.

२० किलो सोन्याचा मुकूट अर्पण किंमत किती?
यंदा लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं होतं. हे सोवळं रोज बदलण्यात येतं. काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आला होता. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली. आता हा मुकूट लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.