Ganesh Chaturthi 2022: यंदा दोन वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबापुरीत गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. असं तर प्रत्येक गल्लोगल्ली त्या त्या ठिकाणचे राजे विराजमान होत असतात पण त्यातही लालबाग परिसरातील गणेशोत्सवाला विशेष मान आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा व गणेशगल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजा सुद्धा यंदा भक्तांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने आज बाप्पाची पहिली झलक दाखवली जाणार आहे. याविषयी लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी लालबागचा राजा व मुंबईचा राजा हा ज्याठिकाणी विराजमान होतो तिथेच त्याची मूर्ती साकारली जाते. त्यामुळे आगमन मिरवणूक जरी नसली तरी हा प्रथम झलक दाखवण्याचा सोहळा अगदी उत्साहात पार पडतो. लालबागचा राजा मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडियाबावर भक्तांना घरबसल्या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. हा सोहळा आज २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पार पडेल यानंतर विशेष फोटोशूट होणार असून लवकरच बाप्पाचे फोटो सुद्धा पाहायला मिळतील. जर का आपल्याला लालबागच्या राजाची पहिली झलक लाईव्ह पाहायची असेल तर या लिंक सेव्ह करून ठेवा.

लालबागच्या राजाची पहिली झलक

लालबागचा राजा Youtube LIVE

लालबागचा राजा Facebook LIVE

दरम्यान, आज मुंबईचा राजा म्हणजेच गणेशगल्लीचा राजा मंडळाने सुद्धा बाप्पाचे पहिले दर्शन आयोजित केले आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह सोशल मीडियावर आपणही ही झलक पाहू शकता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ ऑगस्टला आगमनाधीश चिंचपोकळीचा चिंतामणीची आगमन मिरवणूक पार पडली. ढोल- ताशे, आरत्या- गजरात धुंद होऊन भाविक या मिरवणुकीत तल्लीन झाले होते.

यंदा ३१ ऑगस्टला बाप्पा घरोघरी येणार आहेत, तुमचाही उत्साह व तुमच्या घरच्या बाप्पाचे नवनवीन फोटो लोकसत्तावर पाहण्यासाठी आमचे सोशल मीडिया पेज नक्की फॉलो करा.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugcha raja 2022 first look to be released today when and where to watch live ganesh chaturthi svs