lalbaugcha raja 2024 All Updates : मुंबईसह देशभरात लाडक्या बाप्पाच्या आगमन झाले आहे, मुंबईत वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनेक मंडळांच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात देखील झाली आहे. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरी केली जाईल. हा भव्य उत्सव, ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा उत्सव बुद्धी आणि समृद्धीची देवता, भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा होतो. देशभरात यानिमित्ताने एक वेगळा माहोल, उत्साह पाहायला मिळतो. विशेषत: मुंबईत गणेशोत्सवानिमित्त एक वेगळाच जल्लोष असतो. उंच गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षणाचे केंद्र असते. यातही लालबागचा राजा अनेकांसाठी एक श्रद्धेचे स्थान आहे, त्यामुळे या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तांची रांग लागते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९३४ पासून लालबागच्या राजाबद्दल लोकांच्या मनात श्रद्धेचे स्थान आहे. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पुतळाबाई चाळीत हा भव्य लालबागचा राजा विराजमान होतो. भव्य मंडप आणि त्याभोवतीची सजावट पाहण्यासारखी असते.

ज्याच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातील अनेक बडे नेते, व्यावसायिक, कलाकार आणि अगदी परदेशातील भक्तगणदेखील आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.

आकर्षक सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या लालबागचा राजा विस्मयकारक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करतात. हा राजा ११ दिवस मंडपात विराजमान असतो. दरम्यान, भाविकांना राजाच्या दर्शनसाठी दोन प्रकारच्या रांगा असतात. एक रांग मुख दर्शनाची (चेहरा पाहता येतो) तर दुसरी रांग नवसाची (मूर्तीच्या पायांना स्पर्श करता येते). पण, भक्तांना नवसाच्या रांगेत आपला नंबर येण्यासाठी खूप तास थांबावे लागते.

लालबागचा राजा २०२४ दर्शनाच्या वेळा (lalbaugcha raja 2024 darshan time)

गणेश चतुर्थीच्या काळात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता येते. पाहा दर्शनाच्या वेळा

दर्शन : सकाळी ५.०० ते रात्री ११.००
सकाळची पूजा : सकाळी ६.०० ते ७.००
दुपारची पूजा: दुपारी १.०० ते २.००
संध्याकाळची पूजा : संध्याकाळी ७.०० ते ८.००
सकाळची आरती: सकाळी ७:०० ते ७:१५
दुपारची आरती: दुपारी १:०० ते १:१५
संध्याकाळची आरती : संध्याकाळी ७.०० ते ७.१५

घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन कसे घ्यावे? (Lalbaugcha Raja Darshan Live Streaming)

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष जाता न येऊ शकणाऱ्या भक्तांसाठी ऑनलाइन सुविधादेखील आहे. तुम्ही भारतात असो किंवा परदेशात, तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन लाइव्ह दर्शन घेऊ शकता. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाइव्ह फीड २४/७ उपलब्ध आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन लाइव्ह कुठे पाहायचे? (Lalbaugcha Raja 2024 Darshan Online Link)

अधिकृत वेबसाइट : lalbaugcharaja.com

यूट्यूब चॅनेल : youtube.com/user/LalbaugRaja

फेसबुक पेज : m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम पेज : instagram.com/lalbaugcharaja

एक्स (पूर्वीचे Twitter): twitter.com/lalbaugcharaja

लालबागचा राजा प्रसाद घरी ऑनलाइन ऑर्डर कसा करायचा? (How to order prasad from Lalbaugcha Raja)

जे लोक प्रत्यक्ष भेट देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी प्रसाद तुमच्या दारी पोहोचवून लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेणे आयोजकांनी सोपे केले आहे. जिओ मार्ट आणि पेटीएमच्या मदतीने भाविक आता प्रसाद ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. जिओ मार्ट मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील ऑर्डर स्वीकारेल.

प्रत्येक प्रसाद पॅकेजमध्ये ५१ रुपयांचे दोन बुंदीचे लाडूंची (करांसह) मोफत डिलिव्हरी केली जाईल. यासाठी किमान ऑर्डरची आवश्यकता नाही.

read More News : Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला ‘हे’ चार शुभ योग, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजा वेळ

मुंबईबाहेरील आणि अगदी परदेशात असलेल्यांसाठीही पेटीएम संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसाद वितरित करेल. पेटीएमच्या प्रसाद पॅकेजमध्ये मिठाईसह २५० ग्रॅम सुक्या मेव्याचा समावेश आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugcha raja 2024 darshan timings when and where to live stream link and how to get online prasad delivery during ganesh chaturthi 2024 sjr