Lalbuagcha Raja : गणेश उत्सव म्हटलं की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) या गणपतीची. लालबागचा राजा गणपतीची मूर्ती, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सगळं काही मन मोहून टाकणारं असतं. या मंडळाचं हे ९१ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. लालबागचा राजा गणपतीची पहिली झलक गुरुवारी पाहण्यास मिळाली. त्यावेळी ही माहिती समोर आली

मयूरासनावर विराजमान लालबागचा राजा

यंदा लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) मयूरासनावर विराजमान आहे. राजाची झलक पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया.. लागबागचा राजा… मोरया.. अशा घोषणांनी लालबाग परिसर दणाणून गेला होता. या गणपती बाप्पांचं दर्शन सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भाविकांना घेतले. आपल्या मोबाईलमध्ये लालबागचा राजा गणपतीचं रुप साठवण्यासाठीही मंडळ ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या लालबागच्या राजाचा ( Lalbaugcha Raja ) मुकूट हा सोन्याचा आहे. देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे हा मुकूट अर्पण केला आहे अशी चर्चा आहे.

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
general administration department issued a circular on national heroes anniversaries opposed by mahanubhava corporation
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…
rajesh rokde
राजेश रोकडे ‘जीजेसी’चे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अविनाश गुप्ता
tarkteerth lakshman shastri joshi loksatta articles
तर्कतीर्थ विचार : तर्कतीर्थांच्या विचारांची प्रस्तुतता

हे पण वाचा- लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळात अनंत अंबानी ‘या’ पदावर नियुक्त, मोठी जबाबदारी खांद्यावर

नवसाला पावणारा राजा अशी ख्याती

नवसाला पावणारा लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) अशी लालबागच्या या गणपतीची ख्याती आहे. त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे सेलिब्रिटी, राजकारणी, देश-विदेशातले व्हीव्हीआयपीही येतात. मुकेश अंबानी यांचीही सहकुटुंब उपस्थिती लालबागच्या राजाच्या दर्शनाला असते. या वर्षी अनंत आणि राधिका यांचं लग्नसोहळा पार पडला. यानंतर लालबागचा राजा कार्यकारिणी मंडळाच्या विश्वस्त पदावर अनंत अंबानींची नियुक्ती करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता अनंत अंबानी यांनी लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला आहे.

Lalbaugcha Raja News
लालबागच्या राजाची देखणी आणि सुंदर मूर्ती, गुरुवारी दाखवण्यात आली पहिली झलक (फोटो सौजन्य-लालबागचा राजा एक्स पेज)

२० किलो सोन्याचा मुकूट अर्पण किंमत किती?

यंदा लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं आहे. तर, काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

Story img Loader