Lalbaugcha Raja drawing: आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे श्री गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा गणपती बाप्पाचं आगमन ७ सप्टेंबरला होतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठ-मोठ्या मंडळांत, घरोघरी डेकोरेशनची लगबग सुरू असताना सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत. अशातच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका दिव्यांग कलाकाराने चक्क त्याच्या पायाने गणपती बाप्पाचे चित्र रेखाटले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of Lalbaugcha Raja drawing )

मुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लालबागच्या चरणी नतमस्तक होऊन भाविक आपलं मन मोकळं करतात. अनेक कलाकार बाप्पाचं चित्र रेखाटून आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका दिव्यांग भक्ताने त्याच्या पायाने लालबागच्या राजाचं चित्र रेखाटलं आहे.

हेही वाचा… खाकीतला हिरो! चालत्या लोकल ट्रेनखाली अडकला माणूस अन्.., जीवघेण्या अपघातातून मुंबई पोलिसाने कसा वाचवाला जीव, पाहा VIDEO

८ वर्षांपूर्वीच्या म्हणजेच २०१६ च्या लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja drawing) चित्र या भक्ताने काढलं आहे. “लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात” असं गाणं त्याने या व्हिडीओला जोडलं आहे.

धीरज सातवीलकर असं या कलाकाराचं नाव असून @artistdhirajsathvilkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आतुरता फक्त बाप्पा तुझ्या येण्याची, बाप्पा तुझाच आम्हा आधार, श्री गणेशाय नमः” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओला तब्बल १.३ मिलियन व्ह्यूज आले आहेत तर, १ लाख ३० हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. धीरज यांनी त्यांच्या अकाउंटवर याआधीही अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी आपल्या कलेचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे.

हेही वाचा… Amazonने चक्क दोन वर्षांनंतर केली प्रेशर कुकरची डिलिव्हरी; पोस्ट Viral होताच कंपनीने दिली प्रतिक्रिया, “आम्हाला हे…”

युजर्सच्या कमेंट्स (Users Comments)

व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सने या कलाकाराच्या कलेला दाद दिली आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने कमेंट करत लिहिलं, “भावा तू तुझ्या पायांनी एवढं सुरेख चित्र काढलंस आम्हाला हातानेदेखील असं चित्र काढता येत नाही.” तर दुसऱ्याने “जगातील महान कलाकार” अशी कमेंट केली. तर अनेकांनी कमेंटमध्ये “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोश केला आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugcha raja drawing made by physically challenged artist viral video on social media dvr