Ganesh Chaturthi 2022: आज गणेश चतुर्थीच्या निमित्त जगभरात गणरायाच्या भक्तांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. पुढील दहा दिवस मुंबापुरीत आणि विशेषतः लालबागमध्ये गणेशभक्तांची तुफान रेलचेल पाहायला मिळते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, हे व अशा अनेक मंडळाचे बाप्पा पाहण्यासाठी या दिवसांमध्ये लालबागमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर ३० ऑगस्टपासून कित्येक किलोमीटर दूर रांगा लागल्या आहेत. प्रत्येकालाच रांगांमध्ये उभे राहणे शक्य होतेच असे नाही, त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे खास लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय करण्यात आली आहे.
(Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थी निमित ‘या’ ५ मंत्रांचा आवर्जून करा जप; गणरायाची सदैव कृपा राहील)
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया साईट्सवर आपण या जगप्रसिद्ध बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला लिंक शोधण्यास वेळ लागू नये याची सोय आम्ही केलेली आहे, पाहा:
लालबागच्या राजाचे LIVE दर्शन
यंदा लालबागच्या राजा मंडळाने भक्तांसाठी ऑनलाईन प्रसादाची सोय केलेली आहे. जिओ मारत व पेटीएम वरून आपण ऑनलाईन प्रसाद ऑर्डर करू शकता. (Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र)
आपल्या घरी सुद्धा बाप्पाचे आगमन झाले असेल. गणेशोत्सवाची धम्माल व बाप्पाचे गोंडस फोटो लोकसत्तासह शेअर करायला विसरू नका.