Lalbaugcha Raja : लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिद्ध गणपती आहे. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजा गणपतीची ख्याती आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या ( Lalbaugcha Raja ) चरणी भरभरुन दान दिलं जातं. हे वर्षही त्याला अपवाद नाही.

लालबागच्या राजाच्या चरणी करण्यात आलेल्या दानाची मोजदाद

लालबागच्या राजाच्या ( Lalbaugcha Raja ) चरणी दरवर्षी भरभरुन दान भक्त करतात. तर या दानाची मंडळाकडून मोजदाद देखील करण्यात येतं. लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोने आणि चांदीचा लिलाव केला जातो. त्यामधून जी रक्कम जमा होते, त्यामाध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर राजाच्या ( Lalbaugcha Raja ) चरणी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं दान भाविकांकडून केलं जातं.

हे पण वाचा- Lalbaug Raja Crown : लालबागच्या राजाचा मुकूट लॉकरमध्ये, अनंत अंबानींनी दिलेला २० किलो सोन्याचा अलंकार चर्चेत

लालबागचा राजा गणपतीच्या चरणी ५ कोटी १६ लाख रुपये

दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी पाच कोटी सोळा लाख रुपये रोख रक्कमेचं दान आलं आहे. तर साडेतीन किलो सोनं आणि चौसष्ट किलो चांदी यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आली आहे. लालबागच्या राजाचं ( Lalbaugcha Raja ) दर्शन घेण्यासाठी गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीपासूनच भक्तांनी रांगेत उभं राहण्यास सुरुवात केली होती. तर यंदाही रोख रक्कम, सोनं आणि चांदीचं भरभरुन दान करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी भाविकांकडून केलेल्या दानामध्ये ४२ लाख रुपयांची रोख रक्कमेची नोंद करण्यात आलीये. तर १९८.५५० ग्रॅम सोने आणि ५४४० ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी ६०, ६२, ००० रोख रक्कमेच्या दानाची नोंद करण्यात आली आहे. तर राजाला दुसऱ्या दिवशी १८३.४८० ग्रॅम सोन्याचे दान भाविकांकडून करण्यात आलंय. तसेच ६,२२२ ग्रॅम चांदीच्या दानाची नोंद करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

लालबागचा राजाच्या चरणी कोट्यवधी रुपयांचं दान (फोटो-लालबागचा राजा, गणेश उत्सव मंडळ, एक्स पेज)

पहिल्या दिवशीच २० लाख भाविकांनी दर्शन घेतलं

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास २० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवूड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. याच लालबागच्या राजाला अनंत अंबानी यांनी २० किलो सोन्याचा मुकूट भेट दिला होता. या मुकूटाची किंमत २० कोटी रुपये आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं त्याआधी राजाचा मुकूट काढून ठेवण्यात आला. हा सोन्याचा मुकूट आता लॉकरमध्ये ठेवण्यात आला आहे.