Learn these things from lord ganesha : सध्या देशात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या गणपती बाप्पाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आज आपण गणपतीपासून कोणत्या गोष्टी शिकाव्यात, हे जाणून घेणार आहोत.

  • गणपतीचे वाहन उंदीर आहे. यावरून तुम्हाला समजेल की कोणतीही व्यक्ती लहान किंवा मोठी नसते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आदर करायला पाहिजे.
    जीवनात कोणतेही नाते निभावताना नेहमी समोरच्याचा मनापासून सन्मान करावा. गणपतीचे आणि उंदराचे नातेही असेच आहे. गणपतीच्या आयुष्यात उंदराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • गणपतीजवळ भरपूर ज्ञान होते, बाप्पाने नेहमी ज्ञानाचा सदुपयोग केला. आपणसुद्धा ज्ञानाचा चुकीचा वापर करू नये. जे ज्ञान दुसऱ्यांच्या उपयोगी पडते, ते सर्वश्रेष्ठ ज्ञान असते.

हेही वाचा : गणेशोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर भाविकांची तुडूंब गर्दी; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच…

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
  • गणपतीला हत्तीचा चेहरा लावण्यात आला होता, तरीसुद्धा सर्व गणपत्ती बाप्पावर खूप प्रेम करायचे. यावरून आपण शिकावे की, आपल्या आजूबाजूला जे लोक जसे आहेत त्यांना तसे स्वीकारायला पाहिजे. कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. त्यामुळे व्यक्तीला नेहमी चांगल्या अन् वाईट गुणांसह स्वीकारावे.
  • आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे जीवनाचा भरपूर आनंद घ्यावा, पण आनंद घेताना समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गणपतीच्या पायाकडे तुम्ही कधी लक्ष द्याल तर तुम्हाला दिसेल की, गणपतीचा एक पाय नेहमी जमिनीवर दिसतो. आपणसुद्धा आपल्या आयुष्यात असाच समतोल ठेवायला पाहिजे.
  • हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे, एकदा गणपती आणि कार्तिक या भावंडांना पृथ्वीची परिक्रमा करण्यास सांगितले होते. जो पहिल्यांदा परिक्रमा करून परत येईल तो जिंकेल, असं ठरलं. तेव्हा गणपतीने बुद्धीचा वापर करून शंकर पार्वतीभोवती परिक्रमा केली; यावरून तुम्हाला समजेल की गणपती आई-वडिलांचा किती आदर करायचा, ही गोष्टसुद्धा आपण गणपतीकडून शिकायला पाहिजे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader