मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं. राज ठाकरेंच्या हस्ते गणपतीची आरतीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे हे मागच्या वर्षीही गेले होते. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राजकीय टीका केली असली तरीही या दोघांमधली मैत्री कायम आहे.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चांगली मैत्री आहे. राज ठाकरे हे शिवसेनेत होते तेव्हापासून हे दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतात. राज ठाकरे यांच्या निवासस्थानीही गणपती बसवण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी राज ठाकरेही गेले होते. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सपत्नीक राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनाला गेले होते. २० सप्टेंबरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आज गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी आले होते.
गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर राजकीय चर्चा?
गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का? हे सांगता येणं अवघड आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र राजकीय चर्चा झाली असावी अशीही शक्यता आहे. राज ठाकरेंच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली.
अमित शाह यांनीही घेतलं दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही रविवारी वर्षा या निवासस्थानी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते.