गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी सर्वजण तयारीला लागले आहे. कोणी सुंदर मखर तयार केले तर कोणी फुलांची आरास केली. कोणी दाराबाहेर सुंदर रांगोळी काढली तर कोणी दरवाजाला तोरण बांधले. कोणी बाप्पाासाठी उकडीचे मोदक तयार केले तर कोणी लाडू तयार केले. लाडक्या बाप्पाासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न घरातील प्रत्येकजण करतात. काही लोक गणपतीला २१ दूर्वांची जुडी किंवा जास्वंदाची फुले वाहतात तर काही लोक दूर्वांचा हार तयार करून वाहतात. तुम्हालाही तुमच्या लाडक्या बाप्पासाठी दूर्वांचा हार तयार करायचा आहे का? मग हा जुगाड एकदा वापरून बघा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीला प्रिय आहेत दूर्वा

दूर्वा ही औषधी वनस्पती आहे. त्यामुळे औषध म्हणूनही दूर्वांचे सेवन केले जाते. गणपती बाप्पा दूर्वा खूप प्रिय असतात त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो असे मानतात, म्हणूनच अनेक भक्त त्याला दूर्वा अर्पन करतात. एकवीस दुर्वांची मिळून केलेली एक जुडी सहसा बाप्पाला अर्पण करतात. लाडक्या बाप्पाासाठी तुम्ही दूर्वांचा हार कसा तयार करू शकता जाणून घ्या.

हेही वाचाGanesh Chaturthi Rangoli Designs : बाप्पाचे सुंदर चित्र तर फुलांच्या पाकळ्या! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी काढा ‘या’ सोप्या पाच रांगोळ्या

कसा तयार करावा दूर्वांचा हार

प्रथम २१ दूर्वांच्या काही जुड्या तयार करून ठेवा. त्यानंतर एक उभी लांब फळी घेऊन त्याच्या दोन्ही टोकांना खिळे ठोका. आता या खिळ्यांला तीन पदरी दोरा गुंडाळून घ्या. या दोऱ्यामध्ये एका बाजूने एक दुर्वाची जुडी अडकवा. नंतर त्यावर शेवंतीचे फुल ठेवा त्यात अडकवा. त्यानंतर मोकळा सोडलेला दोऱ्याचा चौथ पदर फळीवर दोऱ्यातून बाहेर काढून दूर्वा व फुलाला गाठ बांधा. त्यानंतर अशाच प्रकारे सर्व दूर्वांची जुडी फुलांसह दोऱ्यामध्ये अडकवा. हार पूर्ण झाल्यानंतर तो खिळ्यातून बाहेर काढा बाप्पाला अर्पन करा. तुम्ही २१ दूर्वांच्या जुडीचा हार बनवू शकता.

दूर्वांचा हार तयार करतानाचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर omtarangaartacademy_kolhapur नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे.