Ganesh Chaturthi 2022: यंदा ३१ ऑगस्टला गणपती बाप्पा लोकांच्या घरी विराजमान होणार आहेत. गणपती बाप्पांच्या होणाऱ्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यावेळी गणेशभक्त पूजेपासून ते सजावटीपर्यंत विशेष काळजी घेताना दिसत आहेत. यासोबतच गणपतीला नैवेद्य दाखवणेही खूप महत्त्वाचे आहे. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व नेवैद्यपैकी मोदक हे सर्वात प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो. मात्र, अनेकजण घरी मोदक नीट बनवले जात नसल्याची तक्रार करतात. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरच्याघरी परफेक्ट मोदक बनवू शकता.
गूळ आणि नारळ चांगले शिजवा
नारळ आणि गूळ एकत्र शिजवताना ते योग्य प्रकारे शिजवणे गरजेचं आहे. यासाठी त्यांना एकत्र शिजवताना सर्व अतिरिक्त ओलावा निघून ते कोरडे होईपर्यंत ते शिजवा. तसंच, आपण ते जास्त शिजवू नये याची देखील विशेष काळजी घ्या.
( हे ही वाचा: Ganesh Chaturthi 2022: या वर्षी कधी होणार गणरायाचे आगमन; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि शुभ मुहूर्त)
ताजे नारळ वापरा
मोदक करताना नेहमी ताजे नारळ वापरा. अनेकवेळा उशीर होऊ नये म्हणून आपण नारळ निवडताना दुर्लक्ष करतो. तर असे न करता नारळ निवडीकडे विशेष लक्ष द्या. ताजे नारळ वापरल्यास मोदकाला येणारी चव देखील वेगळी असते. तसंच मोदक खमंग देखील बनतात.
पीठ मळून घेण्यासाठी योग्य पद्धत वापरा
मोदकासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणे आवश्यक आहे.यासाठी साधारणतः १ कप तांदळाचे पीठ मळण्यासाठी १ कप पेक्षा थोडे जास्त पाणी लागते. जर तुम्ही पाणी घेताना योग्य प्रमाण ठेवले तर तुम्ही बनवलेले मोदक मऊ आणि चविष्ट होतात. त्याच वेळी, पीठ तडतडणार नाही आणि चिकट नाही याची खात्री करण्यासाठी, यासाठी थोडे कोमट पाणी शिंपडा आणि ते पुन्हा मळून घ्या. पीठ नीट मळून घेतल्यास मोदक मऊ आणि तडतडणार नाहीत.
( हे ही वाचा: Gauri Ganpati 2022: यंदा गणपतीत ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी)
हात ओले करून मोदक करावेत
हाताने मोदक बनवताना, एका भांड्यात बोटे बुडवून घ्या आणि नंतर पिठाचा एक भाग घ्या जो चेंडूच्या आकारात असेल. दोन्ही हातांच्या अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या साहाय्याने गोलाकार गतीने पसरून मोदक बनवण्यास सुरुवात करा. दुसरीकडे, जर पीठ चिकट असेल तर पाण्याऐवजी तूप देखील वापरू शकता.