त्याचा विनियोग मग जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी केला जातो. मात्र भपकेबाजपणाचा अवलंब न करता काही मंडळे संवेदनशीलतेचे दर्शन घडवितात. शहर परिसरात बोटावर मोजण्या इतक्याच काही मंडळांनी माळीण दुर्घटनेचा संदर्भ घेऊन जनजागृतीत दाखविलेली संवेदनशीलता त्याच धाटणीची आहे. या माध्यमातून संबंधितांनी सामाजिक प्रबोधनाचा वसा नेटाने चालविला आहे.
येथील रविवार कारंजावरील श्री शनैश्वर भक्त मंडळाच्या वतीने आजवर देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यात येत आहे. बाप्पाप्रेमींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच पर्यावरण संरक्षण करावे अशी साद मंडळाने घातली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मानवी
माळीण घटनेनंतर तज्ज्ञांनी मांडलेली मते, त्यावरील काही लेख यांचे ध्वनिमुद्रित संकलन करत गणेशभक्तांना ते ऐकविले जात असल्याचे पदाधिकारी नितीन माळी यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या सजावटीत भपकेबाज आणि भव्यतेला महत्त्व प्राप्त होत आहे. साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करता येऊ शकतो हे काही जण विसरून गेले आहेत. जनजागृतीची आस मनात ठेवत काम करणाऱ्या अशा काही मंडळांनी धरलेली ही वेगळी वाट महत्त्वपूर्ण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा