Famous Ganpati in Mumbai : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा वादकांपासून सजावट व रंगकाम करणाऱ्यांपर्यंत सर्व जण गणरायाचे स्वागत करण्याच्या तयारीत मग्न आहेत. प्रत्येकाच्या घरी गणपतीला दर दिवशी कोणत्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, याचे बेत आखले जात आहेत. तर, काही लोक यंदा गणेशोत्सवात कुठे फिरायला जायचे, कोणत्या मंडळांच्या प्रसिद्ध गणेशमूर्ती बघायच्या, याची योजना तयार करीत आहेत. तुम्ही जर गणपती बघण्यासाठी मुंबईला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींविषयी जाणून घेणार आहोत.

मुंबईचा राजा

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

मुंबईतील गणेशमूर्ती बघताना सर्वांत आधी मुंबईचा राजा म्हणून ओळखली जाणारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेशमूर्ती व सजावट पाहायला जा आणि गजाननाचे दर्शन घ्या. १९२८ साली गणेश गल्लीत लालबाग-परळमधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व गणेश गल्ली मंडळाने येथे २२ फूट उंचीची गणेशमूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

लालबागचा राजा

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. तेथे दर्शनासाठी देशभरातून लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते. मूर्ती साकारण्यापूर्वी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते, असे म्हणतात. १९३१ रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती,त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसवू, असा नवस केला आणि त्याप्रमाणे १९३४ साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसविण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा : ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच

चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीचा चिंतामणी ही गणेशमूर्ती ही मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून १९२० मध्ये पहिल्यांदा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी येतात.

परळचा राजा (नरे पार्क)

परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. ज्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी म्हणजेच १९४७ साली या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि येथे गणपती बसवण्यात आला. या गणेशमूर्तीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल

माटुंगा येथील जीएसबीच्या गणेशमूर्तीला सर्वांत धनाढ्य गणपती म्हणून ओळखले जाते. जीएसबी सेवा गणेश मंडळाचा हा गणपतीही मुंबईतील मानाचा गणपती आहे. १९५५ मध्ये कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. या गणेशमूर्तीला शुद्ध सोन्याची आभूषणे घातली जातात. गणपतीची ही मूर्ती साकारतानासुद्धा सोन्याचा वापर केला जातो. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी ही मूर्ती सजवली जाते.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी एक म्हणजे केशवजी नाईक चाळीतील गणपती मंडळ. अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीचे आगमन नेहमी पालखीतूनच होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते. हे मंडळ पर्यावरणानुकूल उत्सव साजरा करतात. कित्येक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपून ठेवली आहे.

तेजुकाया मेन्शन गणपती

१९४७ साली तेजुकाया मेन्शन गणपती मंडळाची स्थापना झाली या मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीवर कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे अनेक जण गणरायाची ही मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात.