Baby girl names inspired by Goddess gauri : सध्या सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. गणपतीनंतर लगेच गौरीचे सुद्धा आगमन होतात. ज्येष्ठ गौरी आवाहन हा एक महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सध्या सगळीकडे गौरींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. १० सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. ११, १२ आणि १३ सप्टेंबर हे तीन दिवस गौरींचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान तुमच्या घरी मुलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव गौरीच्या नावावरून ठेवू शकता.
गिरिजा – गौरी म्हणजे पार्वती त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचे नाव गिरिजा नाव ठेवू शकता. गिरिजा हे पार्वतीचे दुसरे नाव आहे.
गिरिशा – गिरिशा हे सुद्धा पार्वतीचे नाव आहे. तुम्ही हे नाव सुद्धा मुलीचे ठेवू शकता.
गोवरी – गोवरी हे देवी पार्वतीचे नाव असून याचा अर्थ उज्वल असा होतो.
गन्धर्वी – तुम्ही मुलीचे नाव गन्धर्वी ठेवू शकता. हे देवी दुर्गेचे नाव आहे.
हेही वाचा : Gauri Pujan 2024 Wishes : गौरी-गणपती सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…
ईशानी – ईशानी हे पार्वतीचे नाव आहे. पार्वती भगवान शिवची पत्नी आहे आणि शिवला ईशान म्हटले जाते.
रुद्राणी – भगवान शिव यांना रुद्र म्हणून ओळखले जाते म्हणून पार्वतीला रुद्राणी म्हटले जाते. हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे.
शिवानी – भगवान शिवच्या पत्नीला शिवानी म्हणतात. तुम्ही हे सुद्धा नाव मुलीचे ठेवू शकता.
देविका – तुम्ही तुमच्या मुलीचे नाव देविका ठेवू शकतात.
हेही वाचा : लाडक्या बाप्पासाठी बनवा दूर्वांचा हार! ‘हा’ जुगाड एकदा वापरून बघा, पाहा Viral Video
धृती – धृती या शब्दाचा अर्थ म्हणजे धैर्य व स्थिरता आहे. हे देवी पार्वतीचे प्रतिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचे नाव धृती ठेवू शकता.
क्षीरसा – क्षीरसा या शब्दाचा अर्थ देवी लक्ष्मी असा होतो. तुम्ही हे सुद्धा नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
श्रीजा – तुम्ही तुमच्या मुलीचे श्रीजा हे सुंदर नाव ठेवू शकता. या नावाचा अर्थ वैभव आणि संपत्ती असा होतो.
वाग्मी – वाग्मी ही जगावर नियंत्रण ठेवणारी देवी आहे. या देवीच्या नावावरून तुम्ही तुमच्या मुलीचे नाव ठेवू शकता.
दित्या – दित्या हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे, तुम्ही हे सुद्धा नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता.