३१ ऑगस्टला संपूर्ण देशात गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घराघरात गणरायाचे आगमन होईल. याचनिमित्ताने आता तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटोदेखील लोकसत्ता डॉट कॉमवर दिसू शकतात. तुम्हालाही लोकसत्ताच्या वेबसाइटवर तुमच्या घरच्या गणरायाला पाहायला आवडेल ना? मग आजच loksatta.com वर तुमच्या घरी आलेल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा. यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या सोप्या पद्धतीचा वापर करायचा आहे.
‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर असा करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो अपलोड
- www.loksatta.com या वेबसाइटवर जा.
- ‘गणेश उत्सव‘ या विभागात जा.
- येथे ‘बाप्पा आमच्या घरचा‘ यावर क्लिक करा.
- आता नवीन टॅब उघडेल. तेथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा.
- तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी लिहा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- काही वेळातच तुमच्या घरचा बाप्पा लोकसत्ताच्या वेबसाइटवर दिसेल.
- तुम्ही अपलोड केलेले फोटो पाहण्यासाठी ‘सर्च’ ऑप्शनवर क्लिक करा.
- ‘सर्च’मध्ये तुमचा ई-मेल आयडी लिहून ‘सबमिट’ केल्यानंतर तुम्हाला बाप्पांचे फोटो पाहता येतील.
- तुम्ही अपलोड करत असलेल्या फोटोची फाईल साइज २ एमबीपेक्षा कमी असावी.