मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मात्र टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून वाहनचालकांची टोलची रक्कम वजा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाहनचालकांमध्ये याबाबत संताप आहे. त्यामुळे फास्टॅगमधून कापून घेतलेली रक्कम वाहनचालकांना परत मिळण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्न करत आहे. टोलनाक्यावर अनेक गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून रक्कम कापली जात आहे. पास असूनही पैसे कापले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याबाबतच्या तक्रारी आल्या असून त्याबाबतची माहिती परिवहन विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

प्राप्त झालेल्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनचालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers going to konkan for ganeshotsav will get the toll deducted by fastag again amy