अलिबाग : गणेश मूर्तीकारांचे गाव म्हणून प्रसिध्द असणाऱ्या पेण मधून १५ हजार गणेशमुर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. तर देशभरात २५ लाख गणेश मूर्ती पाठविण्यात आल्या आहेत. गणेश मूर्तीना यंदा मोठी मागणी होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पेणच्या गणेश मूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशातून मागणी होत असते. पेण तालुक्यात गणपती बनवणाऱ्या ५०० लहान मोठ्या कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे २५ लाख गणेशमूर्ती बनवल्या जातात. यात २३० हून अधिक प्रकारच्या गणेशमूर्तींचा समावेश असतो.

देशाविदेशात या गणेशमूर्तींची विक्री केली जाते. यातून जवळपास ६० कोटींची उलाढाल होत असते. यावर्षी देखील पेण मधून १५ हजार गणेशमूर्ती विदेशात तर २५ लाख गणेशमूर्ती देशभरात पाठवण्यात आल्या आहेत. दरवर्षी गणेशमुर्तींच्या किमतींमध्ये साधारणपणे १० ते १५ टक्क्यांची वाढ होत असते. त्याप्रमाणे यंदाही गणेशमुर्तींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. सुरूवातीला प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमुर्तींवर निर्बंधांचे सावट होते. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना उठाव मिळत नव्हता, मात्र नंतर राज्यसरकारच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवरील निर्बंध हटविण्यात आले.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ

हेही वाचा : साताऱ्यातील इंटरनेट सेवा ७२ तासांनी सुरु

त्यामुळे या गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. त्यामुळे गणेश मूर्तींकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या मुर्त्यांनाही मागणी वाढली आहे. व्यावसायिकांना यंदाही कुशल कारागिरांची कमतरता जाणवली. चांगली मजुरी देऊन कारागीर मिळत नव्हते. मात्र सर्व संकटांवर मात करत मुर्तीकारांनी गणेश मुर्तीचे काम वेळेत पुर्ण केले आहे. देशभरात पेण मधून गणेश मूर्ती रवाना झाल्या आहेत.

शाडूच्या गणेश मूर्तींना मागणी वाढली.

पर्यावरण विषयक जनजागृतीमुळे शाडूच्या गणेशमूर्तींना सातत्याने मागणी वाढत आहे. त्यामुळे मुर्तीकारांकडून शाडू मुर्ती बनविण्यावर भर दिला जातो आहे. एक ते दीड फुटाच्या शाडूच्या मातीने बनवलेल्या घरगुती गणेशमुर्तींच्या मागणीत यंदा लक्षणीय वाढ झाल्याचे मुर्तीकार सांगत आहेत. त्यामुळे पेण शहरात तयार होणाऱ्या एकूण गणेशमूर्तींपैकी ४५ टक्के गणेशमूर्ती यंदा शाडूच्या आहेत.

हेही वाचा : “आरक्षण म्हणजे ‘गरिबी हटाव’ कार्यक्रम नव्हे, हजारो वर्षे…”; छगन भुजबळ यांचे वक्तव्य

गणेशमूर्तींची परदेशवारी

पेणच्या गणेशमूर्तींना यंदा परदेशातूनही चांगली मागणी नोंदविण्यात आली होती. पेण मधून दरवर्षी अमेरीका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, थायलण्ड, मलेशिया, मॉरीशियस आणि दुबई येथे गणेश मुर्ती मोठ्या संख्येनी पाठविल्या जातात. यावर्षीही जवळपास १५ हजार गणेश मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यापासूनच परदेशात गणेशमूर्ती पाठविण्यात आल्या आहेत.

अधिक महिना मूर्तिकारांच्या पथ्यावर

श्रावण सुरू होण्यापुर्वी यंदा अधिक महिना आला होता. हा अधिक महिना गणेश मूर्तीकारांच्या पथ्यावर पडला. मूर्तीकाम करण्यासाठी जास्त वेळ उपलब्ध झाला. त्यामुळे नेहमी पेक्षा यंदा जास्त मूर्त्या तयार करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे या मूर्त्यांच्या वितरणासाठीही चांगली संधी उपलब्ध झाली. ‘करोना काळात गणेशमूर्तींना असलेल्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे गणेशमूर्ती व्यवसायवर मंदीचे सावट होते. पण गेल्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्यावर या व्यवसायाची गाडी रुळावर आली. यावर्षी गणेश मूर्तींना मागणी चांगलीच वाढली आहे.

हेही वाचा : शहा यांच्या सभेस ‘लाभार्थीना’ बोलवा!; मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या पूर्वसंध्येस गर्दी जमविण्याचे प्रशासनाला आदेश

त्यामुळे मूर्तीकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे’, असे पेण गणेश मुर्तीकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी म्हटले आहे. ‘सुरूवातीला निर्बंधामुळे पिओपी मूर्तींना उठाव नव्हता. पण मुंबईतील बैठकीनंतर पिओपी वरील निर्बंध हटविण्यात आले. यानंतर पिओपीच्या मुर्तींची मागणी अचानक वाढली. निर्बंधांच्या भितीमूळे पिओपी मूर्ती फारश्या तयार नव्हत्या, ही कसर मूर्तीकारांनी अधिक महीन्यात भरून काढली. आता पिओपीच्या मोठ्या मूर्तींनाही चांगलीच मागणी होत आहे’, असे पेणमधील मूर्तीकार निलेश समेळ यांनी म्हटले आहे.