दरवर्षीच्या गणेशोत्सवात मुंबईप्रमाणेच पुण्यातील विसर्जन मिरवणूक हा मोठ्या आकर्षणाचा विषय असतो. यंदाच्या वर्षीही गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था यंदा २५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या संस्थेकडून गेल्या २४ वर्षांपासून मंडई चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यान ११ चौकांत सामाजिक विषयांवर रांगोळ्या साकारून नागरिकांचे प्रबोधन करण्याचं काम करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षीदेखील संस्थेनं ही परंपरा कायम राखली आहे.
राष्ट्रीय कला अकादमीनं यंदाच्या वर्षी सायबर क्राईमवर आधारित भव्य अशा रांगोळया साकारल्या.