राज्यामध्ये घडून आलेला सत्ताबदल यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. समुद्रमंथनाच्या धर्तीवर ‘सत्तामंथन’ हा देखावा यंदाच्या उत्सवातील आकर्षणाचे केंद्र ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस बाकी असून सर्वच गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. समाजामध्ये जे घडते त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवामध्ये पडते हा पुणेकरांचा अनुभव आहे.

हेही वाचा – पुणे : विद्युत रोषणाईच्या माळांना वाढती मागणी

देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात –

नरेंद्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील सत्ता मंथनाचा देखावा सादर होणार आहे. या देखाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांच्या कारखान्यावर या देखाव्याचे काम सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हुबेहूब मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. मंडळाच्या अध्यक्षांनी ही संकल्पना दिल्यानंतर देखाव्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हाताशी वेळ कमी असला तरी देखावा उत्तम होईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सतीश तारू यांनी सांगितले.

पुणे : गणेशोत्सवात देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

करोनाच्या दोन वर्षांनंतर दिमाखदारपणे साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. करोना काळात संयमाचे विराट दर्शन घडविणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साहाचे दर्शन घडत आहे. यंदाच्या उत्सवात मंडळांनी नावीन्यपूर्ण विषयांवरील देखाव्यांवर भर दिला असून मंडप उभारणीसह देखाव्यांची तयारीही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे.