Viral Video : पुण्यातील गणेशोत्सव हा सर्वात लोकप्रिय आहे. येथील गणपती बघायला दुरवरून लोक येतात. पुण्यातील गणपती बघण्यासाठी लोकांची भयंकर गर्दी पाहायला मिळते. सोशल मीडियावर सध्या पुण्यातील गणपती आणि गणपती जवळ दाखवणाऱ्या देखाव्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आहे. या व्हिडीओमध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती सुरू आहे. हा व्हिडीओ पहाटे चार वाजताचा आहे पण तरीसुद्धा या व्हिडीओमध्ये तुम्हाला भक्तांची गर्दी दिसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. हे मंदिर आशियातील सर्वात उंच शिवमंदिर आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हे जटोली शिवमंदिर दिसेल. या मंदिरात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या गणपतीजवळ आरती सुरू आहे आणि असंख्य भक्त मनोभावे आरती करत आहे. ही सकाळी पहाटे चार वाजताची आरती आहे तरी सुद्धा लोकांची भयंकर गर्दी दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “श्रींची आरती, पहाटे चार वाजता”

हेही वाचा : Pune Video : वृंदावन आलंय आपल्या पुण्यात! तुम्ही पाहिला का हा सुंदर देखावा, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

just_pune_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गणपती बाप्पा मोरया” तर एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आम्ही घरबसल्या आरतीचा लाभ घेतोय.” आणखी एका युजरने लिहिलेय, “श्रींची आरती” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असे लिहिलेय.

हेही वाचा : बाप्पा सर्वांना आपला वाटतो! गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहत होती महिला अन् अचानक डोळे भरून आले, पाहा भावुक करणारा VIDEO

दगडूशेठ हलवाई गणपतीचा जटोली शिव मंदिरच्या देखाव्याविषयी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण सांगतात, “हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे.जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे.हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. पुराणातील उल्लेखानुसार भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्राम स्थान होते,असे मानले जाते तर जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले आहे आणि ते सलग तीन पिरॅमिड ने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुसर्‍या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते. हे मंदिर बांधण्यासाठी ३९ वर्षे लागली आहेत.या मंदिराची उंची अंदाजे १११ फूट आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून मंदिराचा आकार १२५ फूट लांब,५० फूट रूंद आणि १११ फूट उंच असणार आहे.”

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune video do you want to attend the aarti of dagdusheth halwai ganpati just watch this viral video and you can be witness of aarti at home ndj