लाडक्या बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले आहे. बाप्पासाठी कोणी लाडू तर कोणी मोदक तयार करत आहे. आता लगबग सुरू आहे ती गौराईंच्या स्वागताची. गौराईसाठी फराळाची तयारी झाली आहे. सुंदर फुलांची आरास केली आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: मुंबई आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यात गणेश चतुर्थी दिवशी लाडक्या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरामध्ये स्वागत झाले. फुलांनी सजवलेल्या रथांमध्ये लाडक्या बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे. गणपतीच्या १० दिवसांच्या काळात दरवर्षी या गणपतींच्या दर्शनासाठी लोक अगदी बाहेरगावहूनही येतात. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरुप बदलले असले तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचे महत्त्व आजही तितकेच आहे.
पुण्यातील मानाचे पाच गणपती
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळकांनी पुण्यातूनच या सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली.
कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. हा मानाचा पहिला गणपती आहे.
तांबडी जोगेश्वरी मंदिरातील गणपती हा मानाचा दुसरा गणपती मानला जातो. हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्तीत आहे. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते.
मानाचा तिसरा गणपती म्हणजे गुरुजी तालीम . या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे. याठिकाणी असलेल्या एका तालिममध्ये हा गणपती बसविण्यास सुरुवात झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.
मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती आहे. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. यंदा या मंडळाने श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ मंदिराचा देखावा केला आहे.
मानाचा पाचवा गणपती म्हणजे केसरी वाडा.केसरी या लोकमान्य टिळकांच्या संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. आजही हा गणपती तेथेच स्थापन केला जातो.
हेही वाचा – “कोकणची संस्कृती!”, दादरच्या रेल्वे स्थानकावर कलाकारांनी सादर केली ‘शक्ती तूरा’ लोककला, पाहा Viral Video
सर्वांचा लाडका बाप्पा श्रीमंत दगडूशेठ गणपती
पुणेकरांचा लाडका गणपती म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचा गणपती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने जटोली शिव मंदिराचा देखावा तयार केला आहे.
पाहा पुण्यातील प्रसिद्ध मंडळाचे देखावे
पुण्यात अनेक प्रसिद्ध मंडळ आहेत ज्यांचे देखावे आणि सजावट पाहण्यासाठी भाविक आवर्जून येतात.
हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी बनवा दूर्वांचा हार! ‘हा’ जुगाड एकदा वापरून बघा, पाहा Viral Video
शनिपार मित्र मंडळ – वृंदावन देखावा
श्री गरूड गणपती मंडळ – काळ भैरव महात्म्य
नवनाथ (अचानक) मित्र मंडळ – जोतिर्लिंग दर्शन
साने गुरुजी तरुण मंडळ – भवानी मंदीर तुळजापूर
त्रिशुंड गणपती – काशी विश्वनाथ मंदिर
हेही वाचा – Gauri Pujan 2024 Wishes : गौरी-गणपती सणानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…
पुण्यातील नवसाचा गणपती
छत्रपती राजाराम मंडळ
अखिल मंडई मंडळ – शारदा गणपती
पुण्यातील प्रसिद्ध मंडळाचे देखावे पाहण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्यामुळे हे देखावे प्रत्यक्षात पाहा.