हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नरहर कुरुंदकर अॅडव्हान्स्ड स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटर, नांदेड
कुरुंदकरांचे स्मारक व्हावे यासाठी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. २०१० साली नरहर कुरुंदकर प्रगत अभ्यास व संशोधन केंद्राच्या कामाला सुरुवात झाली.‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’ हा स्टडी सेंटरचा उपक्रम भविष्यातल्या अनेक संकल्पनांची पेरणी करणारा आहे. इतिहासाशी संबंधित वस्तूंचे जतन करणे यासाठी ‘वारसा’, ललित कलांच्या सर्जनशील उपक्रमांसाठी ‘रसास्वाद’, राजकीय, सामाजिक चच्रेसाठी ‘चावडी’ असे वेगवेगळे घटक आणि संकल्पना पुढील काळात या अध्ययन केंद्रात विकसित होताना दिसतील. एका वैचारिक जागराचेच काम अभ्यास केंद्राच्या माध्यमातून चालू आहे. अभ्यास केंद्राला भेटी देणाऱ्या मान्यवरांपकी डॉ. सुधीर रसाळ यांच्यापासून ते यशवंत सुमंत यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तरीही सर्वार्थाने गरज आहे ती व्यापक अशा आर्थिक पाठबळाची.
केंद्राला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मान्यता आहे. मानव्यशात्र आणि सामाजिक शास्त्राच्या अभ्यास व संशोधनावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम भारतात या विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थांची वानवा असल्याने समाजातल्या सर्वच घटकांना सहभागी करून घेत हा उपक्रम अधिक व्यापक करायचा आहे. – श्यामल पत्की, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा
नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत. साहित्य, कला, संगीत, राजकारण, धर्मकारण अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कशा पद्धतीने विचार करायचा ते कुरुंदकरांनी आपल्या ग्रंथसंपदेतून अवघ्या महाराष्ट्राला सांगितले. १९८२ साली कुरुंदकरांचे निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आणि जगभर पसरलेला आहे. अशा विचारवंताच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने चिरंतन राहाव्यात या कल्पनेतून ‘नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान’चा जन्म झाला. प्रतिष्ठानचे विश्वस्त व कुरुंदकरांचे विद्यार्थी, चाहते यांच्या आíथक सहकार्यातून २०१० साली नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्राच्या कामाला सुरुवात झाली. या केंद्रासाठी नांदेड एज्युकेशन सोसायटीने जागा उपलब्ध करून दिली असली तरी अजूनही बांधकाम सुरू व्हायचे आहे.
सध्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्रात या अभ्यास केंद्राचे (स्टडी सेंटर) काम सुरू आहे. चार वर्षांंपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही अद्याप केंद्राची इमारत उभी राहू शकली नाही. या स्टडी सेंटरचा संकल्पित आराखडा तयार आहे. संकल्प खूप आहेत, त्या दिशेने तयारीही चाललेली आहे. गरज आहे ती मोठय़ा आíथक पाठबळाची. सध्या हा स्टडी सेंटरचा उपक्रम नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व नांदेड एज्युकेशन सोसायटीचा संयुक्त उपक्रम आहे. या अभ्यास केंद्रात कुरुंदकरांच्या आस्थेचे जे विषय आहेत त्या सर्व विषयांच्या प्रगत अभ्यासाची सोय करण्याची योजना आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि कुरुंदकरांच्या कन्या श्यामल पत्की यांनी भविष्यातल्या योजनांबद्दलही माहिती दिली. अध्ययन केंद्राला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मान्यता मिळाली असून मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्राचा अभ्यास व संशोधनावर आम्ही लक्ष केंद्रित केले असल्याचे त्या म्हणाल्या. पश्चिम भारतात या विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्थांची वानवा असल्याने समाजातल्या सर्वच घटकांना सहभागी करून घेत हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रतिष्ठानचा मानस असल्याचेही श्यामलताईंनी नमूद केले. या ठिकाणी होणारे संशोधन केवळ चार िभतींत राहू नये, तर त्याचा समाजासाठी उपयोग व्हावा. एक ‘िथक टँक’ म्हणून या अध्ययन केंद्राचे स्वरूप असावे. संशोधक व कार्यकर्त्यांना एकत्र आणून समाजाच्या प्रगतीच्या दिशेने काही पावले टाकणे हा या संशोधन केंद्राचा उद्देश असल्याचेही श्यामल पत्की यांनी सांगितले.
शैक्षणिक अर्हतेची अट नाही
या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधन वृत्ती धारकांनी दोन वर्षांच्या आत आपला प्रकल्प पूर्ण करून तो केंद्राकडे सादर करायचा असतो. आतापर्यंत संस्थेतर्फे विविध विषयांत आठ संशोधन वृत्ती प्रदान केल्या आहेत. मुख्य म्हणजे संशोधकांना शैक्षणिक अर्हतेची अट नाही. त्यामुळे संशोधक पदव्युत्तर असला पाहिजे, असेही नाही. पठडीतील संशोधन कार्यापेक्षा या कामाचे स्वरूप वेगळे आहे. आतापर्यंत संशोधन वृत्तीतून झालेल्या संशोधनाचे स्वरूप पाहिले तरीही या कामाची व्याप्ती लक्षात येऊ शकते. संत दासोपंतांच्या पदरचनांचा सांगीतिक व वाङ्मयीन अभ्यास, मराठय़ांचा इतिहास, कुरुंदकरांची भूमिका असे विविध संशोधन प्रकल्प या संशोधन केंद्रांतर्गत झाले आहेत, काहींची कामे सुरू आहेत.
भविष्यातील प्रकल्प
भविष्यकाळात काही महत्त्वाचे प्रकल्प संस्थेसमोर आहेत. संशोधकांची गरज लक्षात घेऊन एका अद्ययावत डिजिटल लायब्ररीची उभारणी करायची आहे. या संशोधन केंद्रांतर्गत जे संशोधन चालते ते सर्वदूर पोहोचविण्यासाठी एका संशोधन पत्रिकेचाही मानस आहे. या अभ्यास केंद्राच्या माध्यमातून चालविली जाणारी व्याख्याने ही नांदेडकरांच्या वैचारिक श्रीमंतीत भर घालणारी आहे. खुद्द कुरुंदकर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते. स्वानंद मित्रमंडळाच्या माध्यमातून खुद्द कुरुंदकर गुरुजींच्या हयातीतच दोन महत्त्वाची व्याख्याने झाली. त्यावेळी या व्याख्यानमालेत अगदी एक कार्यकर्ता म्हणून राबणारे श्रीनिवास पांडे हे आज या अभ्यास केंद्राचे कोषाध्यक्ष आहेत. १९८२ साली कुरुंदकर गुरुजींच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमाला सुरू करण्याचे ठरले. पहिल्याच वर्षी म्हणजे १९८३ साली दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ यांची व्याख्याने झाली. त्यानंतर ही व्याख्यानमाला पुढे रूपवेध ग्रंथालयातर्फे चालविली गेली आणि आता ती नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानतर्फे चालविली जाते. डॉ. भालचंद्र फडके, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. म. द. हातकणंगलेकर, डॉ. य. दि. फडके, अशोक वाजपेयी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. यशवंत सुमंत आदींसह अनेकांनी या व्याख्यानमालेत हजेरी लावलेली आहे. सध्या सर्वत्र वैचारिक उपक्रमांचेच वावडे असताना आणि व्याख्यानमालेसारखा उपक्रम आजच्या काळात मागे पडत असताना प्रतिष्ठानने अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने ही व्याख्यानमाला चालवली आहे. यातले सातत्य आणि वक्त्यांचे वैविध्य याचे श्रेय प्रतिष्ठानचे विश्वस्त दीपनाथ पत्की यांना जाते.
संकल्पित आराखडा तयार, पण..
सध्या कुरुंदकर स्मारकाचा जो संकल्पित आराखडा आहे तो कुरुंदकरांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव या वास्तूत प्रवेशल्यानंतर यावा असा आहे. भूमितीच्या साध्यासोप्या सिद्धान्तावर आधारित व तर्काचा अनोख्या पद्धतीने आधार घेत या वास्तूचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. स्मारकात अध्ययन कक्ष, सेमिनार हॉल, ग्रंथालय, सभागृह, खुले रंगमंच, चर्चा करण्यासाठी पोषक वाटणारे चौक आदी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदेड परिसरात मुबलकपणे आढळणाऱ्या दगडी बांधकामात ही वास्तू निर्माण करण्याचे नियोजित आहे.
सरकारने सुरुवातीला स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात केली, पण आता आठ कोटींच्या घरात हा सर्व खर्च जाऊन पोहोचला आहे. केवळ बांधकाम झाले आणि स्मारकाची इमारत उभी राहिली म्हणजे काम संपले असे नाही. संगणक, फíनचर अशा अनेक गोष्टींसाठी निधी लागणार आहे. याशिवाय शाश्वत अशा स्वरूपाचा निधी उभारावा आणि त्या निधीच्या व्याजातूनच स्मारकाची देखभाल व सर्व खर्च केला जावा, अशी ही कल्पना आहे. या संदर्भात श्यामल पत्की म्हणाल्या, ‘संस्थेचे पदाधिकारी व संचालक कोणत्याही मानधनाशिवाय सेवाभावी वृत्तीने, पदरचे पसे टाकून हितचिंतकांच्या देणगीतून काम भागवत आहेत. सध्या दैनंदिन खर्च चालवत असतानाच निधी संकलनाच्याही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते. त्यातून कामात अडथळे येतात. गुरुजींचे विद्यार्थी, चाहते आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी मदत केली असली तरीही या सर्व गोष्टींना मर्यादा आहेत. अर्थात ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याविषयीची मनोमन कृतज्ञता आहे, पण जोवर शाश्वत निधी उभारला जात नाही आणि स्मारकाचे काम तातडीने पूर्ण होत नाही तोवर संस्थेच्या मूलभूत कार्याला गती येणार नाही. प्रखर बुद्धिमत्ता आणि कलांचा आस्वाद घेण्याची रसडोळस वृत्ती या दोन्ही गुणांचा समुच्चय हे नरहर कुरुंदकरांच्या प्रतिभेचे व ग्रंथसंपदेचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या या स्मृती स्मारकाच्या रूपाने चिरंतन स्वरूपात पाहायला मिळणार आहेत.
संस्थेपर्यंत कसे जाल?
नांदेड बस स्थानक आणि रेल्वे स्थानकापासून ही संस्था साधारणत: दोन किमी अंतरावर आहे. संस्था शहरातच आहे. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ एवढा पत्ता सांगितला तरी संस्थेपर्यंत पोहोचता येते.
धनादेश या नावाने काढावेत
नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान, नांदेड
धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१
०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.
०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.
०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९,
०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३
नगर कार्यालय
संपादकीय विभाग, आशीष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर.
०२४१-२४५१५४४/२४५१९०७
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली-११०००२.
०११-२३७०२१००