हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष असून या वर्षी मंडळातर्फे ‘काश्मीरच्या दल सरोवरातील हाउसबोट’ हा अतिभव्य देखावा तयार करण्यात येत आहे.
हा देखावा नव्वद फूट लांब, चाळीस फूट रुंद आणि पंचवीस फूट उंच असणार आहे. तसेच हा देखावा दुमजली आहे. देखाव्याच्या मध्यभागी असणाऱ्या सिंहासनावर गणेशमूर्ती विराजमान होणार असून मूर्तीच्या दोन्ही बाजूस जाण्या-येण्यासाठी जिन्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोनेरी, लाल, क्रिम आणि ऑफ व्हाइट अशा रंगांमध्ये हाउसबोट रंगवण्यात आली आहे. हाउसबोटीसमोर तीस फूट रुंद आणि चाळीस फूट लांबीच्या तळे असणार आहे. त्यामध्ये काश्मीरचं प्रतीक असलेले चार शिकारे असतील. देखाव्याची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांची आहे. देखाव्याचे कलादिग्दर्शन व निर्मिती कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.