डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊस बोटीत विराजमान बाप्पाचा देखावा साकारला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी मंडळातील यावर्षीची रौप्यमहोत्सवी सजावट आहे. पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे डोंबिवलीच्या हम संस्थेला काश्मीरमधील दोन शाळांमध्ये सायन्स प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधी संकलन‌ करुन देण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाने सांगितले त्यामुळे आपण काश्मिरशी निगडीत सजावट संकल्पना घेऊया असे ठरले. त्यामुळेच धबडे यांच्या संकल्पनेतून त्यांचा सहकलाकारांसह काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊसबोटीत विराजमान गणेशाची सजावट संकल्पना घेऊन देखावा साकारला आहे.

व्हिडीओ पाहा :

असेच व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

Story img Loader