१० दिवस पाहुणचार घेतल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपती बाप्पा गावी निघणार आहे. संपूर्ण देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. यावेळी मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी कोळी महिलांनी कोळीगीत सादर केले. लालबागचा राजा हा मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक मानला जातो. या राजाची विसर्जन मिरवणूकही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालते. याच राजाच्या विसर्जन मिरवणुकीत कोळी डान्स सादर करण्यात आला. पाहा त्याचाच व्हिडीओ-
पाहा व्हिडीओ